हर हर महादेव चा जयघोष शंकर नगर येथील शिवपार्वती मंदिरात नाम जपाचा शुभारंभ
- हर हर महादेव चा जयघोष शंकर नगर येथील शिवपार्वती मंदिरात नाम जपाचा शुभारंभ
अखंड नाम जपासाठी १ हजार १७६ महिला सहभागी.
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यात हरहर महादेवा पार्वती शंकर सदाशिवा हा नाम जप अखंड महिनाभर सुरू राहणार असून परिसरातील १ हजार १७६ महिला या नाम जपात सहभागी झाल्या आहेत. तत्पूर्वी आज पहाटे शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिरामध्ये सौ.सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते पाटील व कारखान्याच्या संचालिका कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते शिवपार्वती मंदिरात लघुरुद्र अभिषेक करण्यात आला.मंदिराचे पुजारी प्रसाद कुलकर्णी सौ.साक्षी कुलकर्णी यांनी पूजा सांगितली.सकळच्या अभिषेकानंतर कारखान्याची चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना खाली नामजपाचे सुरुवात होऊन हा नामजप दररोज सकाळी सात ते सायंकाळी सात असा पूर्ण श्रावण महिना चालणार आहे. शिवपार्वतीचा मंदिर परिसर “हर हर महादेवा पार्वती शंकर सदाशिवा” या नामजपाने भक्तीमय झाला आहे.यामध्ये सहभागी झालेल्या महिला टप्प्याटप्प्याने नाम जप करतात.श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी केलेली दिसत होती.त्याच बरोबर अकलूज परिसरातील जुने महादेव मंदिर येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने मंदिरावर मोठी आरास करण्यात आली आहे या मंदिरातील सकाळची पूजा अभिषेक नागेश नष्टे यांनी केली तर मंदिरातील फुलांचे आरास त्रिंबक (तात्या) गुळवे यांनी केली - या मंदिरातही सायंकाळी सहा ते सात ओम नमः शिवाय हा नाम जप म्हटला जातो अकलूज गावातील हे मध्यवर्ती मंदिर असल्याने भाविकांच्या दर्शनासाठी लांबलचक रांगा लागलेल्या होत्या वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष विलास क्षीरसागर,उपाध्यक्ष संतोष देव शेटे,कार्याध्यक्ष उदय शेटे,उत्कर्ष शेटे,प्रफुल्ल आंधळकर,ओंकार कुंभार,ओंकार बेलपत्रे,ऋषिकेश कानडे यांच्यासह सर्व मंदिर समितीचे ट्रस्टी मंदिराचे पुजारी जगदीश स्वामी यांनी व्यवस्था चोख ठेवली होती दिवसभर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते रामायण चौकातील मल्लिकार्जुन मंदिरमध्ये समाजाचे सचिव नागेश लिगाडे यांनी अभिषेक व पूजा केली तर नीरा नदीच्या काठावरील महादेव मंदिरातील महादेवास कुंभार समाजाचा पुजाचा मान असून रोहित कुंभार व सुभाष कुंभार यांनी अभिषेक केला याशिवाय किल्ल्या जवळीक बुरजा येथील महादेव मंदिरात सकाळपासून भाविकांनी अभिषेकासाठी गर्दी होती तर आनंदी गणेश येथील स्वयंसिद्ध महादेवास भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.