मार्केट कमिटी तुमच्या बापाची आहे का? हजामती करता का रे? अजितदादांनी बाजार समिती चेअरमन लाच झापले

मार्केट कमिटी तुमच्या बापाची आहे का? हजामती करता का रे?
अजितदादांनी बाजार समिती चेअरमन लाच झापले
संचार वृत्त अपडेट
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत एका कार्यकर्त्याने दिलेले पत्र वाचून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संताप अनावर झाला. बाजार समितीच्या बारामती येथील एका पेट्रोल पंपावरील दीड कोटी रुपयांची उधारी पाहून अजितदादांनी बाजार समितीचे संचालक आणि पदाधिकाऱ्यांना झाप झापले. तू उधारी कशाला देतो, तुला जेलमध्ये टाकेन, तुमच्या काय बापाची मार्केट कमिटी आहे का? तुम्ही काय हजामती करता का रे? अशा शब्दांत अजित पवारांनी भोंगळपणे कारभार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची बिनपाण्याने खरडपट्टी काढली.
संबंधित कार्यकत्याचे पत्रात आपल्याकडे दुप्पट कामगार आहेत, तरीही बारामती बाजार समितीत पुन्हा कामगार भरतीचा घाट यातला आहे. बारामतीतील पेट्रोल पंपाची उधारी दीड कोटी रुपये झाली आहे,’ असा उल्लेख होता. तो वाचून अजितदादा म्हणाले,
पेट्रोल पंपाची उधारी दीड कोटी झाली. तू कशाला उधार देतो. मी तुला जेलमध्ये टाकीन हं, तुला सांगतोय. विश्वासने (विश्वासराव देवकाते) सांगितलं किंवा आणखी कोणी सांगितली तरी द्यायचं नाही. हा काय बावळटपणा चाललाय ?
पेट्रोल सवाल दीड कोटी रुपयांचे डिझेल-कोणाला दिलं? असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. त्यावर संबंधित पदाधिकाऱ्याने वीस जणांना दिल्याचे सांगितलं. ते वीसजण कोण आहेत? आयला येडी आहेत की काय रं ही? म्हणजे मी वरून पैसे आणायचे आणि या नालायकांनी दीड दीड कोटीचं पेट्रोल-डिझेल उधारीवर द्यायचं? तुमच्या काय बापाची आहे का मार्केट कमिटी. तुझ्याही बापाची नाही आणि माझ्याही बापाची नाही. ती माझ्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची आणि हमाल मापाड्यांची आहे.तुम्ही काय करता रे, हजामती करता का? असेही त्यांनी नेतेमंडळींना खडसावले.
बाजार समितीच्या संबंधित पदाधिकाऱ्याने एक महिन्याची मुदत दिल्याचे सांगितले. त्यावर एक महिना नाही ना काही नाही. मीपण पंप चालवतोय. बारामती खरेदी-विक्री संघही पेट्रोल पंप चालवतोय. रवींद्र माने (संघाचे अध्यक्ष) आहे कार रे? तुझी उधारी आहे का? त्यावर त्यांनी डायनामिक्स डेअरीकडे उथारी असल्याचे सांगितले. अजित पवारांनी डायनामिक्सच ठीक आहे, ते कुठे पळून जाणार आहेत. ते हजारो कोटी रुपयांचे मालक आहेत,’ असे स्पष्ट केले.कुणा-कुणाची उधारी आहे, ते मला दाखव. मागच्या वेळी बारामती खरेदी विक्री संघ असाच अडचणीत आला होता. पुढाऱ्यांची उधारी झाली होती, त्यातील एकानेही भरली नाही. त्याची एकशे एकची प्रकरणे (जप्तीची कारवाई) करावी लागली होती. सर्वसामान्यांसाठी ह्या संस्था काढलेल्या आहेत, असेही अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.
चेअरमन संजय कोकरे यांचीही खरडपट्टी
बारामती दूध संघाच चेअरमन संजय कोकरे आले आहे का? त्यालाही सांगा. त्याचेही पाच-सहा पंप झालेत. कुणा-कुणाची किती उधारी आहे, हे मलाही कळलं पाहिजे आणि माळेगाव, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एमडींनाही सांगा की, तिथंपण कोणाची उधारी होता कामा नये. छत्रपती’चे चेअरमन तर उधार देणारच नाही. मी एवढं सांगतोय, बाहेर फुशारक्या मारतोय आणि तुम्ही असेल धंदे करताय का? बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दीड कोटी याच्यामुळं मला कळंल. एवढे दिवस यांनी काय झोपा काढल्या की काय ? बारामती बाजार समितीने स्वभांडवलातून काय काम केलं आहे, ते मला दाखव.