सयाजीराजें च्या बैठकीमुळे अकलूजचा व्यापारी वर्ग आशावादी

सयाजीराजें च्या बैठकीमुळे अकलूजचा व्यापारी वर्ग आशावादी
संचार वृत्त अपडेट
अकलूज नगरपरिषद प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या कार्यशैलीची झलक नुकतीच अकलूजकरांना पाहायला मिळाली.त्यामुळे व्यापारी वर्गाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.सयाजीराजे यांच्या बैठकीमुळे त्यांच्या कार्यशैलीचा प्रत्यय आल्याने व्यापारी वर्ग आशावादी झाला आहे.

त्यांनी व्यापारी वर्गाच्या अडीअडचणी तक्रारी ऐकून घेण्यासाठी व्होरा ज्वेलर्सच्या दालनात सयाजीराजे यांच्या उपस्थितीत व्यापारी वर्गाची बैठक संपन्न झाली.तक्रारी ऐकून घेतल्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना त्यांनी दिल्या विकास कामाबाबत स्पष्ट मार्गदर्शन केले. त्यांच्या या कार्यतत्परतेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.मुद्देसूद प्रश्नामुळे अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती द्यावी लागली.अकलूजचा विकास वेगाने पुढे जावा यासाठी त्यांनी आवश्यक त्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत. सयाजीराजे यांच्या कामकाजातील बारकाईने अभ्यास,जनतेशी थेट संवाद,आणि कार्यक्षमता पाहून व्यापारी वर्गाने ‘बाळदादांच्या कार्याची’ आठवण झालीअसल्याची भावना व्यापारी वर्गांनी व्यक्त केली अकलूजचा विकासाचा वेग कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार या व्यापाऱ्यांच्या बैठकीतून स्पष्टपणे दिसून आला. यावेळी नागरिकांनी कचऱ्यांची समस्या मांडली,भाजी मंडई व शिवापूर पेठेत रस्त्यावर कचरा टाकतात हे अशोभनीय आहे.नगरपरिषदेने आरोग्य यंत्रणेने यावर तत्परतेने कारवाई करणे गरजेचे आहे.याचा त्रास आजूबाजूच्या परिसरातील व्यापाऱ्यांना व नागरिकांना सहन करावा लागत आहे.अकलूजमधील शिवापूर पेठेतील रस्ता रुंदीकरणाचा पण विषय मांडताना व्यापाऱ्यांनी रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी केली.बाधित जागेचा मोबदला म्हणून नगरपरिषद रक्कम देणार का असाही प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.पेठेतून गेलेला पाण्याची लोखंडी पाईप लाईन वरून गाड्या घसरतात व वयोवृद्ध माणसे पाय घसरून पडतात. त्याचाही बंदोबस्त व्हावा अशी मागणी केली.शिवापूर पेठेत येणाऱ्या रोडवरती अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा परिणाम गिर्हाईकावर होत आहे.वाहतूक कोंडी व अपुरे रस्ते यामुळे पेठेतील व्यापाऱ्यावरती बिकट परिस्थितीत निर्माण झाल्याचे व्यापारी वर्गाने निदर्शनास आणून दिले.यावर लवकरच अभ्यास करून तोडगा काढण्याचा सूचना सयाजीराजे मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या दिल्या. या बैठकीस नगर परिषदेचे अधिकारी व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सयाजीराजेंच्या कार्यशैलीमुळे बाळदादांच्या कार्याची आठवण
अकलूज गावच्या प्रगतीमध्ये व विकासात जयसिंह मोहिते-पाटील यांचे योगदान मोठे आहे.त्यांच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत अकलूजचा खरा विकास झाला होता.अकलूजचा ऐतिहासिक कालीन भुईकोट किल्ला नामशेष होण्याचा मार्गावर असताना.आज हा किल्ला जिल्हाचे प्रेक्षणीय स्थळ बनले आहे.मुलांना पोहण्यासाठी ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग टँक बांधला त्यामुळे ग्रामीण भागातील शालेय मुले पोहण्याच्या स्पर्धेत नावारूपास येवू लागली आहेत. पुर्वीच्या काळी पत्राच्या टपरीत दुकान चालवणा-या व्यापा-यांसाठी शाॅपिंग सेंटर उभे केले.अकलूजची पाणी पुरवठा योजना चांगली राबवून अकलूजकरांची कायमचीच तहान भागवली आहे.त्यानंतर त्यांचे चिरंजीव संग्रामसिंह मोहिते-पाटील यांची सरपंच पदाच्या कारकिर्दीत रस्ते व लाईटची सोय झाली व अकलूजचा विकास झाला.आज अकलूज नगरपरिषदेत बाळदादा यांचे नातू सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी अकलूजच्या विकासाची कामे हाती घेतल्यामुळे अकलूजकरांना जयसिंह मोहिते-पाटील यांच्या कार्याची आठवण अकलूजकरांना होवू लागली आहे.



