solapur

श्रेयश कुलकर्णी यांचा लव्हाळे परिवाराच्या वतीने सन्मान

श्रेयश कुलकर्णी यांचा लव्हाळे परिवाराच्या वतीने सन्मान

संचारवृत्त अपडेट 

अँड. श्रेयश कुलकर्णी यांनी बी.ए.एल.एल.बी. (वकील) परीक्षा पास झाल्याबद्दल लव्हाळे कुटुंबीयांकडून त्यांचा फेटा,पुष्पगुच्छ,शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राजाभाऊ लव्हाळे, रविराज लव्हाळे,जीवन लव्हाळे,साईसारंग लव्हाळे,तेजस लव्हाळे, व महेश कुलकर्णी ई. मान्यवर उपस्थित होते.

अँड.श्रेयश महेश कुलकर्णी बीए नंतर वकील व्हायचं हे ध्येय बाळगून श्रेयश झपाटून त्यासाठी वाटेल ते परिश्रम करायचं ठरवून होता.त्याचे वडील महेश कुलकर्णी अर्थात हे नाव व व्यक्ती अकलूजकरांची परिचयाची कारण कुलकर्णी ब्रदर्स हा अकलूज मधील वृत्तपत्र वितरण व्यवसायातील सुरवात त्यांच्या कडे महेश हा वृत्तपत्र वितरणाची जबाबदारी गेली ३६ वर्ष संभाळतोय.त्याच्या पुढे या नोकरीवर कसे शक्य ही चिंता त्याची पत्नी सौ.मनीषाताईचा अंगणवाडी सेविका या नोकरीचा हातभार ..परंतु मग श्रेयशनी स्वतः मराठी व इंग्रजी टायपिंग शिकत वकिली फर्म मध्ये कामास लागत मुळात प्रॅक्टिकल ज्ञान घेतच सीईटी देत ऍडमिशन घेतलं.माळशिरस कोर्टात अग्रगण्य वकील अँड.शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली डिग्री संपादन करत आपल्या स्वप्नांची पूर्तता केली.
तो यशस्वी झाला महेश कडून समजले घरी दादांना बोलल्या वर दादांना त्याच कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही. कारण अकलूज सेवा सोसायटीच्या माध्यमातून श्रेयशचे आजोबा मनोहर कुलकर्णी व दादा हे कर्मचारी नात्याने दोस्त.. मनोहर कुलकर्णी तथा’मनूकाका’ हेही अकलूजकरां साठी चिरपरिचित असे नाव परिस्थितीवर मात करत दोस्ताचा नातू वकील झाला हा आनंद त्यातच आज साई-सारंग व तेजस हे त्रिकुट ही गणपती उत्सव निमित्ताने अकलूज मध्ये त्यांचीही गाठभेट व ओळख म्हणून श्रेयश व महेश बाप-लेकाला सन्मानित करता आले.त्याचबरोबर या क्षेत्रातील आव्हाने कशी व त्यासाठी किती अभ्यासू व्हायचे याबाबत उहापोह झाला.
चि. श्रेयशच्या भावी कारकिर्दीस लव्हाळे परिवाराच्या मनःपूर्वक शुभेच्छा.व मित्र महेश व कुलकर्णी परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन.

रविराज लव्हाळे 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button