डाँ.आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन
डाँ.आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन
अकलूज(प्रतिनिधी)साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अकलूज येथील पुतळ्यास जनसेवा संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर च्या सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्या आदरणीय मा.पद्मजादेवी मोहिते-पाटील यांचे हस्ते अभिवादन करण्यात आले .
सदुभाऊ चौक अकलूज येथील महाराष्ट्र राज्य जनसेवा रिक्षा चालक मालक संघटनेच्या आयोजित केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यक्रमात प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते चे माजी प्राचार्य डॉ.चंद्रकांत कोळेकर, जनसेवा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस मयुर माने,काॅंग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष नवनाथ भाऊ साठे माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे अ जा. सेलचे अध्यक्ष रघुनाथ भाई साठे जनसेवा संघटनेची तालुका उपाध्यक्ष शिवाजी जाधव शशिकांत भोसले, जनसेवा रिक्षा संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड उपाध्यक्ष योगेश पाहुणे रिक्षा संघटनेचे शहराध्यक्ष चंद्रकांत कोळी, सुरेश साठे विजय खंडागळे व जनसेवा चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.