solapur

एकमेकांवरील राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीने महाराष्ट्रची प्रतिमा मलीन

एकमेकांवरील राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीने महाराष्ट्राची प्रतिमा मलीन

बी.टी.शिवशरण

कधी नव्हे ते महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे राजकारण गढुळ झाल्यानं सर्वसामान्य जनतेला राजकारण कोणत्या स्तराला गेले आहे याचा उबग आला आहे एकमेकांवर होत असलेले करत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीने महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे त्यामुळे राजकीय धुळवडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आहे हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात कायम महाराष्ट्र हा सुसंस्कृत तसेच थोर संत विचारवंत साधु महात्म्य शूर वीर यांच्या पराक्रमी इतिहासाचा आदर्श तत्वज्ञान व सुपिक विचारांचा महाराष्ट्र म्हणून हृदयांत स्थान मिळवलेला महाराष्ट्र आहे परंतु हल्ली महाराष्ट्रातील सद्य स्थिती वातावरण वाटचाल पाहिली तर महाराष्ट्र बिहारच्या दिशेने जातोय की काय ही सर्वसामान्य जनतेला भीती वाटते आहे या पुर्वी वेगवेगळ्या क्षेत्रात काही ठराविक लोक आपलं धटींगण नेतृत्व करुन ते क्षेत्र काबीज करण्याचा प्रयत्न करताना ऐकलं होतं पाहिलं होत पण विद्यमान परिस्थितीत एरवी स्वतःला साधु संताचे अवतार समजणारे साधन शुचिता याचा ठेका केवळ आपल्या कडेच आहे की काय अशा आविर्भावात जगणारे वागणरे केवळ आणि केवळ सत्ता आपल्या कडेच कशी राहील किंवा मिळवता येईल या साठी सर्व विधीनिशेद वापरत आहेत सक्तवसुली संचनालय स्थानिक पोलीस स्टेशन यांचा वापर करून तसेच इतरांचे पक्ष फोडून आमदार पळवून राजकारण केले जात आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा सर्वसामान्य जनतेला आता उबग आला आहे जातीपातीच्या राजकारणाचे पुन्हा डोके वर काढले जात आहे आरक्षण जात धर्म एकाधिकारशाही या विषयाला खतपाणी घालून इथली सामाजिक राजकीय परिस्थिती धोक्यात आणण्यासाठी इथलं कमकुवत नेतृत्व तोंडावर बोट ठेवून डोळ्यांवर मस्ती ची झापड पांघरणयाचे सोंग घेऊन महाराष्ट्र अस्थिर करु पहात आहे सारे एकाच माळेचे मणी ओवायला नाही कुणी अशी एकंदरीत परिस्थिती आहे त्यामुळे कणखर महाराष्ट्र राकट महाराष्ट्र केवळ सक्षम व पुरोगामी नेतृत्व नसल्याने डळमळीत होऊ पहात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button