solapur

अकलूज नगरपरिषदने घरपट्टी वाढ केल्याने नागरिकांतून प्रचंड नाराजी हरकती दाखल

  • अकलूज नगरपरिषदने घरपट्टी वाढ केल्याने नागरिकांतून प्रचंड नाराजी हरकती दाखल

अकलूज(प्रतिनिधी)

  • अकलूज नगरपरिषदने नागरिकांना अचानक घरपट्टी वाढीचा झटका दिल्याने अकलूज मधील नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या बाबत येथील काही सामाजिक राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांनी नागरिकांना घरपट्टी वाढी संदर्भात हरकती घेण्यासाठी जाहिर आवाहन सोशल मिडीयावर केले होते.त्यानुसार अनेकांनी हरकती नोंदवल्या आहेत.  नगरपरिषद प्रशासकीय यंत्रणा यांचेकडून नागरिकांना कोणत्याही प्रकारे माहिती सुचना दिली नाही तसेच अचानक घरपट्टी वाढ करण्याचे सबळ कारण दिलेलं नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत. अकलूज नगरपरिषद अस्तित्वात येऊन तीन वर्ष कालावधी जवळपास होत आहे शासनाने अकलूज नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर केलेला नाही नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली आहे.एकून दरवाढ 23%आहे.त्या मध्ये वृक्षकर,उपयोग कर,शिक्षणकर,रोजगार हमी ई. कर लावण्यात आले आहेत. शासनाचा जिआर आम्हाला आला आहे असे नागरिकांना सांगण्यात येत आहे. अकलूजकरांना नागरीसुविधा व इतर सहकार्य कशाप्रकारे करते या बाबतीत नागरिकांतून उलटसुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळतात अकलूज नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे सर्वच राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते नेते यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button