सद्गुरु श्री श्री कारखान्यावर प्रजासत्ताक दिन साजरा

सद्गुरु श्री श्री कारखान्यावर प्रजासत्ताक दिन साजरा
संचार वृत्त अपडेट
पिलीव प्रतिनिधी (रघुनाथ देवकर):-सांगली सातारा सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील सर्व शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या दि आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते सद्गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याच्या वतीने सालाबाद प्रमाणे चेअरमन शेषागिरी रावसर व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचा ७५वा प्रजासत्ताक दिन कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा .बाळासाहेब कर्णवर पाटील यांचे शुभ हस्ते तर सद्गुरु श्री श्री इंग्लिश स्कूल या ठिकाणी आयोजित केलेला प्रजासत्ताक सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याच्या संचालिका सौ उषाताई मारकड यांच्या हस्ते आपल्या देशाचा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व ध्वजगीत गायले व कवायतीचे प्रकार झाले तर सुरक्षा विभागाकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी केन मॅनेजर सुनील सावंत व इतरांची मनोगते झाल्यानंतर मा. व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी आपल्या देशाचा इतिहास व वर्तमान काळ उपस्थितितांना आपल्या मार्गदर्शनातून सांगत आपण सुद्धा देशसेवेचे व्रत अंगीकारलं पाहिजे देशसेवा करण्यासाठी आपल्या देशाबद्दल प्रेम व निष्ठा पाहिजे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणाने काम करणे ही सुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे आणि आपण सर्वांनी अशा प्रकारे देशसेवा केली पाहिजे आणि तरुण पिढीला व्यसनाधीन ते पासून वाचवले पाहिजे ही काळाची गरज आहे त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकरी बांधवाला नैसर्गिक शेतीचे महत्व पटवून दिलं पाहिजे.
अशा प्रकारचे मार्गदर्शन करून आपल्या या कारखान्याची होत असलेली प्रगती तशीच भविष्य काळामध्ये सुद्धा वाढत गेली पाहिजे आणि याच्यासाठी आपण ऊस उत्पादक शेतकरी बांधव वाहन चालक मालक यांच्याशी हितगुज ठेवले पाहिजे अशा प्रकारे उपस्थितांना संबोधित केले. यावेळी व्यासपीठावरती कारखान्याचे हितचिंतक नयुमखान पठाण, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी खांडेकर जनरल मॅनेजर रेड्डीसर, डेपोटी जनरल मॅनेजर भगवान पाटील, एच आर सचिन खटके, सुरक्षा अधिकारी श्री बोडरे, चीप केमिस्ट श्री.सोलंकर, शेती अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर,सिव्हिल इंजिनियर अवधूत जमदाडे प्राचार्य नागेश श्रीखंडे , पि.टी शिक्षक श्री वनवे तसेच सर्व खात्याचे खाते प्रमुख कामगार कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आभार समारंभ नंतर अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला