राजकीय षडयंत्र करणाऱ्या भाजप चा शिवसेने कडून निशेध
राजकीय षडयंत्र करणाऱ्या
भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा
पंढरपूर शिवसेनेने केला निषेध.
पंढरपूर (प्रतिनिधी) राजकीय षडयंत्र करुन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूर शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेधाच्या घोषणा देवून कटकारस्थाचा निषेध करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे व आ. अनिल परब यांना खोट्या केस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न उघडला पडला.तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणून खोटी शपथपत्र तयार करण्याचा डाव देशमुख यांनी हाणून पडला.भाजप हे कुटील षडयंत्र या निमित्ताने उघडे पडले. विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करीत असून त्यांचा निषेध करण्यासाठी पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.यावेळी सुधीर अभंगराव, जयवंत माने, बंडू घोडके, रवी मुळे, संगीता पवार, पूर्वा पांढरे, विनय वनारे, लंकेश बुराडे, सचिन बंदपट्टे, प्रवीण शिंदे, इंद्रजित गोरे, श्रीनिवास उपळकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.