solapur
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामाजिक न्याय की सामाजिक अन्याय
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामाजिक न्याय की सामाजिक अन्याय? अँ.अविनाश टी.काले.
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष प्रा धनंजय साठे यांनी दिनांक 29 जुलै 2024रोजी पंढरपूर येथील के बी पी कॉलेज समोर हॉटेल धनश्री येथे दुपारी 1 वाजता प्रदेश अध्यक्ष मा पंडित जी कांबळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक बोलावली आहे ,
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम राव जानकर यांना निमंत्रित केले आहे .
सोलापूर जिल्ह्यातील जनता जाणते की उत्तमराव जानकर हे धनगर समाजाचे नेते असून ते धनगर खाटीक नाहीत .स्वतः चे फायद्यासाठी जात बदलून त्यांनी धनगर खाटीक म्हणून स्वतः ला घोषित केले आहे , आणि देवेंद्र जी फडणवीस यांच्या माध्यमातून राजकीय दबाव वापरून अनेक क्लृप्त्या करून जात दाखला न्यायालयीन दृष्ट्या मान्यता प्राप्त करून घेतला आहे .त्यांच्या दोन्ही अपत्याच्या दाखल्याला जात पडताळणी ऑफिस कडे आव्हान देण्यात आल्याने ते दाखले प्रलंबित आहेत .
स्वतः चां जनाधार ढासळल्याने आपण निवडणूक जिंकू शकत नाही हे हेरून सोलापूर लोकसभा तिकीट भाजपने नाकारल्या नंतर त्यांनी स्वतः ला राष्ट्रवादी काँग्रेस शी जोडून घेतले , त्या पूर्वी मुलाखत देताना , माझा डी एन ए भाजपा च असल्याचे त्यांनी म्हणले होते त्याच्या क्लिप माध्यमात आहेत.
मोहिते पाटील यांचा एक गठ्ठा असलेला एक लाखाचे पुढील मतदार व आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेब यांना मानणारा 30ते 40हजार मतदार माळशिरस तालुक्यात आहे हे हेरून , आपल्या मुळेच मोहिते पाटील विजयी झाल्याचे सोंग त्यांनी आणले आहे .
जो माणूस स्वतः कधी आमदार म्हणून निवडून आलेला नाही तो राष्ट्रवादी काँग्रेस च्या 100जागा निवडून आणण्याची भाषा बोलतो .
भारतीय राज्य घटनेने अनु जाती साठी राखीव ठेवलेल्या जागेवर अतिक्रमण करून ती जागा बळकावण्याचा ते प्रयत्न करत आहेत
पण आम्ही निर्धार पूर्वक पक्षाला सांगत आहोत की
अश्या बनावट जात उमेदवाराला पक्षाचे तिकीट देण्याचं नादानपण राष्ट्रवादी काँग्रेस श प ने करू नये ,
माळशिरस तालुक्यातील नवबौध्द व मातंग समाजाची लोकसंख्या 2011चे जन गणने नुसार 88हजार होती , व त्यात किमान 20हजार ची वाढ झालेली आहे याचा सरळ अर्थ ही मते 1,08000(एक लाख आठ हजार आहेत )या दोन समुदायाला सातत्याने तिकीट वाटपात डावलून कोणी सामाजिक न्यायाची बाता मारत असतील तर ती बाब आम्हास मान्य व कबूल नाही .
आमचा इशारा डावलून उत्तम राव जानकर यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास आम्ही दलीत विरोधी पक्ष म्हणून घोषित करून या पक्षास नवबौध्द व मातंग समाजाने मतदान न करता ते त्यांच्या विरोधी पक्षास देण्याची भूमिका घेऊ ,,
व हे अभियान सार्वत्रिक महाराष्ट्रभर राबवू .
या होणाऱ्या परिणामा स स्वतः पक्ष कारणीभूत ठरेल याची नोंद घ्यावी
ऍड .अविनाश. टी. काले
माजी राज्य सचिव सामाजिक न्याय
राष्ट्रवादी काँग्रेस