आता चर्चा ३१ डिसेंबरची नव्हे…२१ डिसेंबरची… निवडणूक निकालाची उत्सुकता ; उरले फक्त सहा दिवस

आता चर्चा ३१ डिसेंबरची नव्हे…२१ डिसेंबरची…
निवडणूक निकालाची उत्सुकता ; उरले फक्त सहा दिवस
संचार वृत्त अपडेट
डिसेंबर महिना सुरू झाला की,सर्वांना सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागताचे वेध लागतात.यंदा मात्र अकलूज मध्ये ३१ ला नव्हे तर २१ डिसेंबरला जल्लोष होणार आहे. कारण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी अनेकांनी गुलाल उधळाची तयारी केली आहे.त्यासाठी अवघे सहा दिवस उरले असल्यामुळे सर्वजण दि. 21 डिसेंबर ची वाट पाहत आहेत. त्यामुळे 31 डिसेंबर ऐवजी चर्चा आहे ती २१ डिसेंबरचीच.अकलूज मध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीमुळे सगळ्या वातावरणात राजकीय रंग चढला होता २ डिसेंबरला मतदान झाले. 3 डिसेंबरला निकाल लागणार होता मात्र निवडणूक आयोगाने काही निवडणुका दि.२० डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्याने अनेकांचा हिरमोड झाला. यामुळे निकाल दि.३ ऐवजी दि. २१ डिसेंबरला लागणार हे निवडणूक आयोगाने जाहीर करताच अनेकांना धक्का बसला. निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत टीकांची झोड सुरू झाली, तर उमेदवारांना चांगलाच घाम फुटला कार्यकर्ते स्टार प्रचारक चांगलेच शांत झाले. आणि त्यांना हा निर्णय अमान्य असूनही तो स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नाही.सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारापेक्षा विरोधी पक्षांचे उमेदवार अपक्षांनी निकालाबाबत शासंकता व्यक्त केली राजकीय वातावरणात पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू झाली जसे जसे दिवस जातील तसे दि. 21 डिसेंबर ही एकच तारीख सर्वांच्या डोळ्यापुढे दिसत आहे. आता निकालाला फक्त सहा दिवस उरले आहेत ज्यांना विश्वास आहे की आपणच निवडून येणार त्यांनी जल्लोषाच्या हालचाली सुरू केल्या आहेत फटाके आणून ठेवले आहेत, विजय मिरवणुका काढणार आहेत, बॅनर लावण्यात येणार आहेत, कार्यकर्त्यांनी पार्टीचे नियोजन केले आहे. काहींनी तर हॉटेल मालकांना तारीख आणि वेळ निश्चित करण्यात सांगितले आहे यामुळे यंदा वर्ष अखेर ३१ डिसेंबर ऐवजी दि.२१ डिसेंबरलाच साजरी होणार असल्याने व्यवसायिकांना अच्छे दिन आल्याचेही चर्चा आहे.
ईव्हीएम मशीन कडे लक्ष…
निवडणुकीत ईव्हीएम मशीन नको असे म्हणत अनेकांनी विरोध केला परंतु ईव्हीएम मशीन पूर्णतः सुरक्षित असल्याची हमी निवडणूक आयोगाने दिली आहे. आता ३ डिसेंबरचा निकाल २१ डिसेंबरला लागणार हे कळतात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी निकाल लागेपर्यंत आम्ही जाऊन राहतो अशी मागणी उमेदवारांनी केली मात्र त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने कोणीही प्रवेश करू शकत नाहीत असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हरल्यावर दोष मशीनचा…
सत्ताधारी पक्षातील अनेक निष्ठावंतांना तिकिटे न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरले,तर काहींनी इतर पक्षांमध्ये प्रवेश करून तिकिटे मिळवली त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली या बदलत्या समीकरणावर निकाल काय लागणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे; परंतु ज्यांना विश्वास आहे की आम्हीच निवडून येणार, ते हरल्यावर पुन्हा ईव्हीएम मशीनला दोष देणार,अशी चर्चा सुरू आहे



