solapur

उजनी धरण शंभर टक्के भरल्यामुळे युवा सेनेच्या वतीने जलपूजन

उजनी धरण शंभर टक्के भरल्यामुळे युवा सेनेच्या वतीने जल पूजन

संगम (प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्याला वरदायनी ठरलेलं उजनी धरण हे 100 % भरल्या मुळे युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवा सेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या वतीने उजनी धरणाचे जल पूजन करण्यात आले व पंढरपूरच्या विठू रायाला व गणपती बप्पा ला साकडे घालण्यात आले की या वर्षी तरी उजनी धरण हे पुढाऱ्यांच्या तावडीतून हे वाचावे व उजनी धरणाचे पाण्याचे नियोजन हे शेतकऱ्यांना वर्ष भर पुरेल अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी करावे . गेल्या वर्षी उजनी धरण हे 63 % भरलेले होते परंतु अक्कलकोटचे भाजप चे आमदार सचिन कल्याणशेट्टी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जलसंपदा मंत्री व पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांना हाताशी धरून गरज नसतानाही दोन दोन महिने कॅनॉल चालू ठेवले व उजनी धरण हे मोकळे केले. जर या ही वर्षी पाण्याचे उजनी धरणाचे नियोजन जर योग्य पद्धतीने नाही झाले तर अधिकाऱ्यांना खुर्चीवरती बसू देणार नाही असा ईशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे .यावेळी जल पुजन करताना गुणा वाघ शिवाजी वाघ, दिलीप निकम, बाळासाहेब व्यवहारे, तात्यासो पिसाळ, सोमनाथ वाघ, विकास भोई, ओम पराडे,अमित भोई,आदित्य भोई आदित्य इंगळे ई. उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button