अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यापीठ परीक्षेमध्ये उज्वल निकालाची परंपरा
सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यापीठ परीक्षेमध्ये उज्ज्वल निकालाची परंपरा कायम
संचार वृत्त
अकलुज( प्रतिनिधी) सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२४ चा प्रथम वर्षातील द्वितीय सत्राचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये कु. कोमल राजेंद्र सालगुडे पाटील हिने ८६. ८७ % गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक, कु. काजल विजय घोगरे हिने ८६.२५% गुण प्राप्त करून व्दितीय क्रमांक तर कु. गौरी दत्तात्रय इंगोले हिने ८५% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा मा. स्वरूपाराणी मोहिते पाटील, संस्थेचे सचिव मा. राजेंद्र चौगुले यांनी विशेष कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील विध्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
तसेच महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रथम वर्ष पदवीची प्रवेश प्रक्रिया चालू असून प्रथम फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया दि. ०९/०८/२०२४ ते ११/०८/२०२४ या कालावधीमध्ये होणार आहे. तरी पंचक्रोशीतील इंजिनिअरिंग साठी प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला भेट देवून आपला ऑप्शन फॉर्म विहित मुदतीत भरून घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी केले आहे.