श्रीपुर मध्ये दिशादर्शक फलकाचे अनावरण
श्रीपूर मध्ये दिशादर्शक फलकाचे अनावरण
संचार वृत्त (बी.टी.शिवशरण)
श्रीपूर (प्रतिनिधी) श्रीपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात दिशादर्शक फलकाचे अनावरण डॉ हरिश्चंद्र सावंत पाटील व भाऊसाहेब कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील नाभिक सेवा संघ व आरपीआय आठवले गट यांचे सौजन्याने सदर दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे श्रीपूर हे पूर्व भागातील दळणवळण असलेलं महत्वाचे शहर आहे पंढरपूर नेवरे उंबरे मिरे जांबूड बोरगाव या गावाकडे जाणारे बाहेर गावचे प्रवासी नागरिक यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर वर नमूद केलेल्या गावाकडे जाण्याचा मार्ग विचारावा लागायचे तेव्हा येथील नाभिक सेवा संघाचे श्रीपाद जाधव यांनी स्वखर्चाने सदर दिशादर्शक फलक तयार केला आहे बाहेर गावच्या नागरिकांना माहिती उपलब्ध झाली आहे यावेळी डॉ हरिश्चंद्र सावंत पाटील भाऊसाहेब कुलकर्णी भालचंद्र शिंदे पत्रकार बी टी शिवशरण गुडुलाल शेख गौतम आठवले श्रीपाद जाधव तानाजी जमदाडे शिवाजी खंडागळे समाधान जमदाडे नारायण खटके दिलखुश मुलाणी अमोल मोरे सोपान शिंदे डॉ साहिल पठाण बापू जंगम राजू खाडे इंद्रजित जमदाडे सुनील सुरवसे रामभाऊ यादव भीमराव भाग्यवंत इत्यादी उपस्थित होते