शांतीदूत श्री श्री रविशंकरजी यांच्या भेटीमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली ; धैर्यशील मोहिते पाटील

शांतीदूत श्री श्री रविशंकरजी यांच्या भेटीमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली ; धैर्यशील मोहिते पाटील
संचार वृत्त अपडेट
अकलूज ता.माळशिरस सहकाराची पंढरी असणाऱ्या अकलूज नगरीमध्ये शांतीदूत परमपूज्य श्री श्री सद्गुरु रविशंकर गुरुजी यांचा महासत्संग त्याचबरोबर शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी गेलो असता त्यांच्या अध्यात्मिक व सामाजिक कार्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असे प्रतिपादन माढ्याचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.
बेंगळुरु (कर्नाटक) येथील आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्र बेंगळुरु आश्रम येथील विविध अध्यात्मिक वैदिक गुरुकुल,श्री श्री ग्रामीण विकास प्रकल्प (एस एस आर डी सी) अंतर्गत युवकांसाठी सोलर इन्टॉलेशन,ई- बाईक रिपेरींग ,मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण प्रकल्प, आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल,गोशाळा, गो अधारीत सेंद्रीय शेती अशा प्रकल्पांची पहाणी केली.
यानंतर मोहिते पाटील यांनी अकलूज, सोलापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक व सहकारी अशा लोककल्याणकारी प्रकल्पांसोबतच कृष्णा भीमा स्थिरीकरण या नदी जोड प्रकल्पा विषयी माहिती दिली. यावर बहुत अच्छे,आप तो बहुत बढीया जनसेवा करते है,आपको शुभकामनाये असे म्हणत श्री श्री गुरुदेव रविशंकर यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे कौतुक केले. लवकरच अकलूज येथे होणाऱ्या कार्यक्रमास येणार असल्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी माळशिरस वैदिक धर्म संस्था आश्रमचे स्वामी सौम्यानंद,आर्ट ऑफ लिव्हिंगग योग शिक्षक प्रा.धनंजय देशमुख व माळशिरस आश्रम कमिटीचे सदस्य हरीभाऊ माने,भारत सावंत,सत्यवान पराडे, विजय मोरे,डॉ. प्रताप जाधव,निलेश देशमुख,आप्पासाहेब पांढरे, धनाजी पांढरे,संजय माने,सोमनाथ मस्के उपस्थित होते.