solapur

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी ओबीसी सेलच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी अरुण तोडकर यांची निवड

अरुण तोडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी ओबीसी सेल सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड

श्रीपूर(प्रतिनिधी)

सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य व मोहिते पाटील घराण्यातील त्यांचे निकटवर्तीय समर्थक श्रीपूर येथील युवा नेते अरुण तोडकर यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पार्टीचे सोलापूर जिल्हा ओबीसी सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ओबीसी चळवळीतील एक उमदे तडफदार नेतृत्व म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे ओबीसी सेल चे त्यांनी माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणून जोरात काम केले आहे त्यांच्या त्या कामाची दखल म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना महाळुंग गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली व ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले अत्यंत सरळ साधा स्वभाव सर्वसामान्य लोकांत मिसळून त्यांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात रांगडी भाषा खळाळून हसणे या मुळे अरुण तोडकर सर्व कार्यकर्त्यांत नेत्यांत लोकप्रिय झाले आहेत सोलापूर जिल्हा परिषदेत मुजोर व निष्क्रिय अधिकारी यांना त्यांनी वठणीवर आणले आहे असं म्हटलं तर ते चुकीचे होणार नाही मोहिते पाटील यांचा पट्टा म्हणून सोलापूर जिल्हा परिषद त्यांनी दणाणून सोडली आहे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोरगरीब व मागासवर्गीय समाजातील योजना उपक्रम त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी मनापासून काम केले आहे दलित वस्तीतील अंतर्गत रस्ते गटारी समाजमंदिर वाचनालय या साठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे मोहिते पाटील यांच्या महत्वाच्या आघाडीतील कार्यकर्त्यांत त्यांचे नाव आहे निराधार महिलांसाठी असणार्या शासकीय योजना वृध्द नागरिकांना श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजना या व अशा अनेक योजना राबवण्यासाठी त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे ते विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात सतत लहानपणापासून मोकळा ढाकळा स्वभाव दुसर्याच्या मदतीला धावून जाणे यामुळे ते पहिल्यापासून चर्चेत रहाणारे नांव आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी सोलापूर जिल्हा ओबीसी सेल चे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्या पासून जिल्ह्यातील कार्यकारिणी ते लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी चे जिल्ह्यात पक्ष संघटन वाढवून कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी चा बालेकिल्ला बनवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करु अशी त्यांनी ग्वाही दिली आहे श्रीपूर मध्ये अरुण तोडकर यांच्या रुपाने बहुजन तरुणाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी ने काम करण्याची चांगली संधी दिली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button