solapur

कारखान्यांनी उपपदार्थ उत्पन्नातील प्रति टन ५००रु. द्यावेत अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन करणार ; राजू शेट्टी

कारखान्यांनी उपपदार्थ उत्पन्नातील प्रति टन ५००रु. द्यावेत अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन करणार ; राजू शेट्टी

संचार वृत्त अपडेट 

साखर कारखान्यांना साखरेसह इथेनॉल, मळी, सहवीज निर्मितीतून मिळणा-या जादाच्या उत्पन्नाकडे लक्ष वेधत त्यातून ऊस उत्पादकांना प्रति टन ५०० रुपये द्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली असून याबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास हंगामास विरोध जाहीर केला आहे. आगामी गळीत हंगामाच्या उंबरठ्यावर या नव्या मागणीमुळे साखर उद्योगाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

वावर्षीच्या ऊस गळीत हंगामाची तयारी साखर उद्योगाकडून सुरू झालेली आहे. यंदा हंगाम लवकर सुरू व्हावा, असाही प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यापूर्वीच शेतकरी संघटनांनी ही मागणी केली आहे. गेल्या दोन-तीन हंगामामध्ये साखर उद्योगाला साखर या मुख्य उत्पादनासह इथेनॉल, मळी,

सहवीज निर्मिती आधी उपपदार्थांतून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे. ऊस दर २०१३ कायद्यातील तरतुदीनुसार वातील ७० वाटा हा ऊस उत्पादकांना देण्याची तरतूद आहे. याच आधारे शेतकरी संघटनांनी यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रति टन ५०० रुपये ऊस उत्पादक शेतक-यांना यावेत, अशी मागणी उचलून धरली आहे. त्यासाठी प्राथमिक पातळीवर जागोजागी आंदोलनेही सुरू झाली असून हंगाम सुरू होईपर्यंत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी गेल्या काही वर्षांपासून साखर उद्योगाला साखर या मुख्य उत्पादनासह इथेनॉल, मळी, सहवीज निर्मिती आधी उपपदार्थांतून चांगले उत्पन्न मिळत आहे. यातील काही वाटा म्हणून प्रत्येक कारखान्याने प्रति टन ५०० रुपये द्यावेत. याची अंमलबजावणी न झाल्यास हंगामाच्या प्रारंभीच आंदोलन सुरू करण्यात येईल.

– राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ऊस दर २०१३ कायद्यातील तरतुदीनुसार साखर व उपपदार्थ उत्पन्नातील ७० टक्के वाटा शेतकऱ्यांना देण्याचे धोरण आहे. गेल्या वर्षी साखर, बगॅस आणि मळी विकून कारखान्यांना प्रती टन ६६०० रुपये उत्पन्न मिळाले. गेल्या तीन हंगामात साखर व प्राथमिक उप पदार्थांना बाजारात उच्च दर मिळत आहेत. यातून साखर कारखाने मोठा नफा कमावत असताना त्यातील वाटा ते शेतकऱ्यांना देत नाहीत.

धनाजी चुडमुंगे, अध्यक्ष, आंदोलन ‘अंकुश’ संघटना

संघटनेने कोल्हापूर विभागातील कारखान्यांचा दौरा पूर्ण केला असून, आता सोलापूर जिल्ह्यामध्ये लक्ष केंद्रित केले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रति टन ५०० रुपये द्यावेत, अशी मागणी केलेली आहे. साखर कारखान्यांच्त्या वार्षिक

सर्वसाधारण सभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याच्या दृष्टीने या संघटनेने हालचाली सुरू केल्या आहेत. शिरोळ तालुक्यातील आंदोलन ‘अंकुश’ या शेतकरी संघटनेने सोमवारपासून विविध साखर कारखान्यांवर दुचाकी यात्रा काढायला सुरुवात केलेली आहे. या संघटनेकडून देखील या उपपदार्थ उत्पन्नातील वाटा

शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून स्वतंत्र चूल बांधलेल्या जय शिवराय शेतकरी संघटनेकडूनही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना निवेदन देऊन हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रति टन ५०० रुपये ऊस उत्पादन शेतकऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. ऊस उत्पादनाचा खर्च वाढत चालला असल्याने साखर कारखान्यांकडून कमी दर मिळाला आहे. ऊस उत्पादन खर्चामध्ये दुप्पट वाढ झाली असल्याने आणखी प्रति टन आणखी ५०० रुपये देण्यात वावेत, अशी मागणी संघटनेचे नेते शिवाजी माने, सदाशिव कुलकर्णी, वैभव कांबळे, गब्बर पाटील आदींनी चालवली आहे. दुसरीकडे साखर कारखान्यांनी अजूनही प्रती किंटल ५०० रुपये तोटा होत आहे. जुनी कर्ज कायम आहेत. नवीन कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत असे कारखाना प्रशासकाकडून सांगण्यात येत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button