शिवछत्रपती गणेश उत्सव मंडळाचे वतीने श्रीपुर मधील स्मशानभूमीत स्वच्छता अभियान
शिवछत्रपती गणेश उत्सव मंडळाचे वतीने श्रीपूर मधील स्मशानभूमीत स्वच्छता साफसफाई.
श्रीपूर(प्रतिनिधी)
येथील शिवछत्रपती गणेश उत्सव मंडळ शिवाजीनगर या मंडळाचे वतीने श्रीपूर मधील स्मशानभूमीत स्वच्छता व साफसफाई केली त्यामुळे हा परिसर स्वच्छ लख्ख केला मंडळाचे श्रीपूर महाळुंग परिसरात कौतुक केले जात आहे मंडळाचे वतीने गेल्या दोन दिवसांपुर्वी रक्तदान शिबीर आयोजित केले होते अत्यंत जबाबदारीचे भान असलेल्या व सामाजिक जाणीव व बांधीलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न या मंडळाकडून केला जातो त्या परिसरातील गरजू व अडचणीतील नागरिकांना मदतीसाठी सहकार्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सदैव तत्पर असतात स्मशानभूमीची स्वच्छता व करण्यासाठी महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे सफाई कर्मचारी यांनीही सहकार्य केले असाच उपक्रम सामाजिक काम इतर सामाजिक संघटना यांनी ही पुढे येऊन हा आदर्श जपला तर गाव स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला मिळाल्या