माळशिरस तालुका विधानसभेला आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी देण्याची मागणी
माळशिरस तालुका विधानसभेला आरपीआय चे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी देण्याची मागणी
श्रीपूर(बी.टी.शिवशरण ज्येष्ठ पत्रकार)
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे लवकरच रणशिंग फुंकले जाणार आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हा अनुसूचित जाती साठी राखीव मतदारसंघ आहे महाराष्ट्रात आरपीआय सोलापूर गटाची भाजपचे व एकनाथ शिंदे यांची शिवसेना गटाबरोबर युती आहे निवडणुकीत जागा वाटपात माळशिरस ची जागा आरपीआय आठवले गटाला सोडण्यात यावी अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील आरपीआय आठवले गटाने केली आहे माळशिरस साठी आरपीआय आठवले गट प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना उमेदवारी दिली जावी अशी आग्रही मागणी सोलापूर जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्त्यांनी केली आहे माळशिरस तालुक्यात भाजप आरपीआय आठवले गट एकनाथ शिंदे यांची शिवसेना युती मधून राजाभाऊ सरवदे यांनाच उमेदवारी दिली जावी माळशिरस चे फिक्स आमदार म्हणून राजाभाऊ सरवदे हे निवडून येणारच ही काळया दगडावरची निळी रेघ आहे राजाभाऊ सरवदे यांना आमदार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रामदास आठवले यांचेकडे आता पासूनच तयारी सुरू केली आहे भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना युतीने लोकसभेला आरपीआयला एकही जागा सोडली नाही या वेळी विधानसभा निवडणुकीत युतीतून माळशिरसची जागा आरपीआयला सोडून युतीचा धर्म पाळावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.