सामाजिक सलोखा आणि ऐक्य आबाधित राखणारेअकलुज माळेवाडी येथील मोरया गणेशोत्सव मंडळ!..
सामाजिक सलोखा आणि ऐक्य आबाधित राखणारेअकलुज माळेवाडी येथील मोरया गणेशोत्सव मंडळ!
अकलूज माळेवाडी दत्तनगर येथील आसिफ शाफिक तांबोळी हे मोरया गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून समाजाला एक अनोखा संदेश देत असून सामाजिक सलोखा व ऐक्य अबाधित राहावे म्हणून मागील 22 वर्षापासून हे श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतात तो स्वतः मुस्लिम असून सुद्धा सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी दरवर्षी श्री गणेशाची प्रतिष्ठान करत आहेत
शिवसेनेचे नेते स्वर्गीय शिवसेना नेते दत्ताआप्पा वाघमारे व स्व.प्रशांत भोंगळे यांच्या प्रोत्साहनामुळे आजतागायत ही परंपरा त्यांनी कायम ठेवली असून मागील 20 वर्षांपूर्वी आसिफ शफिक तांबोळी याला कॅनॉल मध्ये श्री गणेशाची मूर्ती सापडली होती त्यामुळे ते प्रभावित होऊन त्याला श्रद्धा निर्माण झाली आणि परिसरातील सर्व समाज हिंदू मुस्लिम बांधवांना बरोबर घेऊन गणेशोत्सव साजरा करत आहे शिवाय गणेशोत्सवात प्रत्येक वर्षी महाप्रसाद आणि अन्नदानाचे नियोजन हे सर्वांच्या सहकार्याने केले जाते यामध्ये सर्व जाती-धर्माचे भाविक सहभागी होत असतात हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रत्येक असून हल्ली सर्वत्र जातीय सलोखा बिघडवण्याचे प्रकार चालू असून त्यालाही सणसणीत चपराक आहे यावेळी बोलताना आसिफ शफिक तांबोळी म्हणाले की आज काही लोक देशाचे एकता अखंड आणि जातीय सुलोखा बिघडवण्याचे काम करत असून आम्ही मात्र जातीय सलोखा आणि ऐक्य आबाधित राखण्याचे पवित्र कार्य करत असल्याचे सांगितले.