solapur
सामाजिक कार्यकर्त्या,पत्रकार सायली जवळकोटे यांचे निधन
सायली जवळकोटे यांचे निधन
सोलापूर : सुप्रसिद्ध साहित्यिका, पत्रकार अन् सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सचिन जवळकोटे ( वय 54 ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता आकस्मिक निधन झाले. *त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी वीरशैव लिंगायत रुद्रभूमी, रूपभावानी रोड येथे होणार आहे.त्यांनी आजपर्यंत संचार, लोकमतसाठी लिखाण केले. आकाशवाणी अन् आजतक चॅनेलसाठीही काम केले. ‘लोकमत सोलापूर’चे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांच्या त्या धर्मपत्नी होत. त्त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई अन् दोन नातवंडे आहेत.