solapur

माढा विधानसभा निवडणुकीत जेवढे जादा उमेदवार उभे राहतील तेवढा फायदा रणजितसिंह यांना होण्याची शक्यता

माढा विधानसभा निवडणुकीत जेवढे जादा उमेदवार उभे रहातील तेवढा फायदा रणजितसिंह शिंदे यांना होण्याची शक्यता

श्रीपूर(बी.टी.शिवशरण जेष्ठ पत्रकार)

विधानसभा निवडणूक वातावरण ढवळून निघाले आहे माढा विधानसभा निवडणुकीत यावेळी अनेक जण आमदार होण्याचे स्वप्न बाळगून तयारीला लागले आहेत कदाचित माढा विधानसभा निवडणुकीत सात ते दहा उमेदवार यांच्यात लढत होईल अशी अपेक्षा आहे कारण माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी या मतदारसंघात अनेकांनी संवाद यात्रा भेटीगाठी चर्चा सुरू केली आहे माढा विधानसभा मतदारसंघांचे नेतृत्व आमदार बबनदादा शिंदे यांनी सलग पाच वेळा केले आहे या पंचवार्षिक ला माढा विधानसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे लढणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे सामाजिक राजकीय सहकार शैक्षणिक औद्योगिक संस्थांच्या माध्यमातून शिंदे परिवार यांनी मोठे योगदान दिले आहे त्यामुळे अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत सतत दुष्काळ व पाण्याचे दुर्भिक्ष व बेरोजगारी असा शिक्का बसलेल्या माढा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात पाण्याचा प्रश्न सोडवला सहकारी साखर कारखाना माध्यमातून शेतकरी सभासद कामगार यांना न्याय दिला सामान्यातील सामान्य माणसाला आपला माणूस आपला नेता वाटावा असे जिव्हाळ्याचे आपुलकीने संबंध आमदार बबनदादा शिंदे यांनी जपले आमदार बबनदादा शिंदे यांनी गोरगरीब जनतेला मदतीसाठी सहकार्य करण्याची भूमिका जोपासली त्यामुळे शिंदे परिवार व त्यांच्या युनिट वर सर्वांनी विश्वास ठेवून त्यांना सलग पाच वेळा निवडून दिले या वेळी रणजितसिंह शिंदे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांनीही संपूर्ण मतदारसंघात संवाद सुरू केला आहे भेटीगाठी संपर्क व मतदारसंघातील समस्या अडचणी अपुरी विकास कामे करण्यासाठी स्वतः ते संपर्कात राहत आहेत यावेळी शिंदे यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की माढा विधानसभा निवडणुकीत जेवढे जादा उमेदवार उभे रहातील त्याचा आपसूकच मतदानाचा फायदा रणजितसिंह शिंदे यांना होणार आहे मत विभागणी होणार आहे आमदार बबनदादा शिंदे यांचे मतदान यावेळी वाढणार आहे नवीन कोणी जे उमेदवार असतील त्यांच्या मतांची मोठ्या प्रमाणावर विभागणी होईल आणि आमदार बबनदादा शिंदे यांचे हक्काचे व नवीन वाढलेलं मतदान यामुळे शिंदे यांचं पारडे जड रहाणार हे नक्की अशी कार्यकर्त्यांतून बोललं जातं आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button