आ.अभिजीत पाटील यांना निवडणूकीतील आश्वासनाचा विसर

आ.अभिजीत पाटील यांना निवडणूकीतील आश्वासनाचा विसर
महाळुंग श्रीपूर नगरपंचायत ला निधी देण्याच्या नावाने ठणठणाट
संचार वृत्त अपडेट
श्रीपूर(प्रतिनिधी)गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुक प्रचार सभेत श्रीपूर मध्ये आमदार अभिजित पाटील यांनी महाळुंग श्रीपूर नगरपंचायतला कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही विकास कामे अशी करणार की महाळुंग श्रीपूर नगरपंचायत चा हेवा वाटला पाहिजे रस्ते गटारी तसेच विकासात्मक बदल करण्यासाठी दोनशे कोटी रुपये निधी आपण उपलब्ध करून देऊ अशी मोठी गर्जना व आश्वासन त्यांनी दिले होते त्यावेळी प्रचार सभेत माळशिरस तालुक्यातील दिग्गज नेते कार्यकर्ते उपस्थित होते लोकांना वाटले नव्या दमाचे प्रतिनिधी आहेत बोलल्या प्रमाणे ते नक्कीच मोठा निधी महाळुंग श्रीपूर नगरपंचायत ला उपलब्ध करून देतील पण कशाचे काय नऊ ते दहा महिने झाले आमदार साहेबांनी कोणताही निधी दिला नसल्याचे सांगण्यात येते माजी आमदार बबनराव शिंदे यांनी त्यांच्या आमदार निधीतून जवळपास चाळीस कोटी रुपये निधी विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला होता त्यामुळे काही कामे होऊ शकली काही कामांना गती मिळाली महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे प्रशासकीय कार्यालय बांधण्यासाठी नुतन जागा पहाण्यासाठी आमदार महोदय गेल्या पाच महिन्यांपूर्वी महाळुंगला येऊन गेले ते पुन्हा इकडे आले नाहीत कार्यालय जागेचे काय झाले हे त्यांनाच माहीत आमदार महोदयांनी दिलेल्या आश्वासनांची निदान टप्प्या टप्प्याने तरी पूर्तता करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे असे म्हटले जाते की आमदार महोदय गेले कुणीकडे नगरपंचायत मध्ये समस्या तक्रारींचा पाढा चोहीकडे.



