वडापुरी येथे महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडापुरी येथे महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
संचार वृत्त अपडेट
महिलांनी घरातील सर्वांची काळजी घेत असताना स्वतःचे आरोग्यही जपणे गरजेचे आहे. गावातील महिलांच्या आरोग्याची काळजी श्रीनाथ परिवाराच्या माध्यमातून घेतली जाते हे श्रीनाथ परिवाराचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी शुश्रुत शहा यांनी केले.
ते वडापुरी ता. इंदापूर येथे श्रीनाथ परिवार व सामाजिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात बोलत होते.या शिबिराचे उद्घाटन जेष्ठ महिला केशर शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी वडापुरी उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिक्षा गार्डे ,शर्मिष्ठा देशमुख,डॉ.करुणा चंदनशिवे,गायत्री माने, सारिका माने,अस्मा शेख यांच्या सह अनेक महिला उपस्थित होत्या. या शिबिरात वडापुरी गावातील तसेच परिसरातील ७७ महिलांची रक्तदाब, शुगर, थॉयरॉईड सह किडनी, लिव्हरची तपासणी करण्यात आली. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून महिला आरोग्य कर्मचारी व उपस्थित गावातील ज्येष्ठ महिलांचा श्रीनाथ परिवाराच्या वतीने आयोजक प्रा.धनंजय देशमुख,हरिभाऊ माने विठ्ठल कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कुमारी वैष्णवी शहाजी पवार हिने महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दादासाहेब जगताप,अमोल चंदनशिवे, सुरज काटकर,मंगेश माने, संतोष पासगे,जयपाल चंदनशिवे,रणजित चंदनशिवे तसेच आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्रीनाथ परिवाराचे संस्थापक प्रा.धनंजय देशमुख यांनी केले.