अकलूजचे प्राचार्य डॉ. सुभाष शिंदे यांचा श्रीलंका येथे शोध निबंध सादर
अकलूजच्या प्राचार्य डॉ.सुभाष शिंदे यांचा श्रीलंका येथे शोध निबंध सादर.
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
अकलूज-शंकरनगर येथील ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शिंदे यांना श्रीलंका येथे झालेल्या पाचव्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन अप्लाइड अँड प्युअर सायन्सेस (ICAPS -२०२४) या परिषदेत विशेष निमंत्रित म्हणून शोधनिबंध सादरीकरणाचा बहुमान मिळाला.
कोलंबो-श्रीलंका येथे फॅकल्टी ऑफ सायन्स युनिव्हर्सिटी ऑफ कलेनिया यांच्या विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एक्सप्लोरिंग मोनोकॉट डायव्हर्सिटी इन साऊथ महाराष्ट्र: इम्प्लिकेशनस फॉर कंजर्वेशन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट असा डाॅ.सुभाष शिंदे यांच्या शोध निबंधाचा विषय होता.डॉ.शिंदे यांनी त्यांचे मार्गदर्शक कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुकचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत साळुंखे यांच्या समवेत,सन १८२२ साली स्थापन झालेल्या पेराडेनिया – कॅन्डी येथील जगप्रसिद्ध रॉयल बोटेनिक गार्डनला भेट दिली. जगभरातील अत्यंत दुर्मिळ वनस्पतींची व तेथील हार्बेरियम म्यूझियममध्ये जतन केलेल्या विविध वनस्पतींची माहिती त्यांनी संकलित केली आहे.या परिषदेसाठी देश-विदेशातील ११० संशोधक उपस्थित होते.यापूर्वीही डॉ.सुभाष शिंदे यांनी इजिप्त, इंडोनेशिया या देशासह शिलॉंग, चेन्नई,कलकत्ता इत्यादी ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष आ. रणजीतसिंह मोहिते-पाटील, उपाध्यक्षा सौ.सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील,सचिव खा. धैर्यशील मोहिते-पाटील,शिवरत्न शिक्षण संस्था अध्यक्षा सौ. शीतलदेवी मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते- पाटील,संस्थेचे सर्व संचालक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.