solapur
दिलीप शेठ व्होरा यांचे दुःखद निधन
दिलीपशेठ व्होरा यांचे दुःखद निधन.
अकलूज (प्रतिनिधी)
अकलूज येथील जेष्ठ सराफ व्यावसायिक,अकलूज सराफ व सुवर्णाकार संघाचे आधारस्तंभ दिलीपशेठ केवळचंद व्होरा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.ते ७५ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,सून,जावाई,नातवंडे असा परिवार आहे.जुन्या काळापासून अकलूज येथील शिवापूर पेठमधील एक विश्वसनीय सराफी व्यवसायातील पेढी आहे.त्यांची अंत्ययात्रा आज शिवापूर पेठ येथून दुपारी १२:३० मिनीटानी निघणार आहे.