मंत्रिमंडळात समावेश करण्याची पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मागणी;सोमनाथ भोसले
राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे यांचा मंत्रिमंडळात समावेश करून पीपल्स रिपब्लिकन पार्टीला न्याय देण्याची युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे मागणी
संचार वृत्त अपडेट
राज्यामध्ये महायुतीचे सरकार आणण्याकरिता महायुतीचा घटक पक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीने सुद्धा राज्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे हे महायुतीच्या मेळाव्यासाठी कोल्हापूरला जात असताना रस्त्यामध्ये त्यांच्या कारचा अपघात होऊन त्यांना डोक्याला मार लागून 14 टाके पडले होते डॉक्टरांनी त्यांना आराम करण्यास सांगूनही त्यांनी आराम न करता डोक्याला पट्टी असतानाही महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रत्येक मेळाव्यामध्ये उपस्थित राहून महायुतीचा प्रचार केला मुंबई येथील मेळावा दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या तब्येतीची विचारणा करून ते करीत असलेल्या कार्यास शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्रातील बहुजन समाजाने भारतीय जनता पार्टी व महायुतीला भरभरून मतदान केले आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात महायुतीला एक नंबरच्या जागा मिळाल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही पीपल्स रिपब्लिकन पार्टीने महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देऊन कोणत्याही मतदारसंघाची मागणी केली नव्हती तसेच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पीपल्स रिपब्लिकन पार्टीने कोणत्याही जागेचा आग्रह न धरता बिनशर्थ पाठिंबा देत महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची कामगिरी बजावली आहे.राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीची शिवसेना शिंदे गटाबरोबर युती आहे परंतु पीपल्स रिपब्लिकन पार्टीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आजपर्यंत सत्तेत योग्य वाटा दिलेला नाही त्यामुळे आंबेडकरी चळवळीमध्ये याबाबत नाराजी आहे त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा सन्मान राखण्यासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊन आंबेडकरी चळवळीचा मान राखावा अशी लेखी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी केली आहे.