आर्ट ऑफ लिव्हिंग,अकलूज च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
आर्ट ऑफ लिव्हिंग, अकलूज च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
संचार वृत्त अपडेट
आर्ट ऑफ लिव्हिंग अकलूजच्या वतीने मुंबई येथे २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ तसेच संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ४२ रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. शिबिराचे उद्घाटन माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री विठ्ठल गायकवाड यांनी केले.
यावेळी सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकचे प्रमुख डॉ. संतोष खडतरे,रोटरी क्लब ऑफ सराटी डी लाईटचे चार्टर प्रेसिडेंट श्री नितीन दोशी ,योग शिक्षक गोरख डांगे,प्रमोद लंबटकर, सचिन पाटील सर हिंगणगाव,आबा सुर्यवंशी आदी उपस्थित होते. विशेष यावेळी सौ.हर्षला देशमुख, गितांजली अहिवळे, चारुशीला गायकवाड, सोनाली मोरे आदी महिलांनीही रक्तदान केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धनंजय देशमुख यांनी तर आभार माऊली मुंडफणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राकेश गायकवाड, ईश्वर कदम,सत्यम सरक, रेहान शेख यांनी परीश्रम केले.