मंत्रालय ते अकलूज पर्यंत मविसेचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

मंत्रालय ते अकलूज पर्यंत मविसेचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू
नीरा नदीत दूषित पाणी सोडनाऱ्यावर व दूषित पाणी सोडणाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी
संचार वृत्त अपडेट
अकलूज मधील नीरा नदीमध्ये आणि पुरंदवडे हद्दीत दूषित पाणी सोडनाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी मागणीसाठी अकलूज येथील साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली ४ फेब्रुवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत असून या दोन्ही ठिकाणी दूषित पाणी सोडणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांना माहीत असताना सुद्धा ते संबंधित दूषित पाणी सोडनाऱ्यावरती वरती कारवाई करत नाहीत म्हणून अकलूज येथील डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर गेले सात दिवस झाले बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.सकारात्मक उत्तर न दिल्याने व योग्य चौकशी न केल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांचे २३ जानेवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंतचे (कॉल डिटेल्स रेकॉर्ड )तपासण्याची करून संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करावी या मागणीसाठी मुंबईतील मंत्रालयासमोर आझाद मैदान येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.आंदोलनाला महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे हनुमंत भुसनर,पप्पू गायकवाड, संदीप धुमाळ उपस्थित आहेत.