धवललसिंह मोहिते पाटील यांचा जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा
डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा.
संचार वृत्त
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला.
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे चिरंजीव सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष युवक हृदयसम्राट डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी आज आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता.युवकांचे हृदयसम्राट डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू खंदे समर्थक माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सतीश नाना पालकर,अकलूज शहराध्यक्ष नवनाथ भाऊ साठे, युवक उपाध्यक्ष मयूर माने, कैलास जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले त्यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या विचाराचा वारसा व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द सुरू आहे. सहकार महर्षी व स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी राजकारणामध्ये ताठ मानेने राजकारण केलेले महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पाहिलेले आहे. तोच वसा आणि वारसा जपणाऱ्या डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या धाडसी निर्णयाचे राजकीय वर्तुळामध्ये कौतुक केले जात आहे.पक्षाचे काम करीत असताना शिंदे गटाकडून अडथळा निर्माण केला जात आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तिकीट वाटपात शिंदे गट प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय करणार हे चित्र दिसत असल्यामुळे काँग्रेस पक्षासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर ते मी कदापि सहन करणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे