solapur

शरद पवारांना मारकड वाढीचे आकर्षण का वाटते; गोपीचंद पडळकर

शरद पवारांना मारकड वाढीचे आकर्षण का वाटते; गोपीचंद पडळकर

संचार वृत्त अपडेट होत 

जिल्ह्यातील माळशिरसमधल्या मारकडवाडी गावात आज महायुतीची सभा झाली. या सभेत जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे.

महाराष्ट्रातील धनगर समाज लोकशाही विरोधात आहे असे वातावरण तयार केले. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. या मतदारसंघात 100 गावं आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवाराने केले, असं गोपीचंद पडळकर म्हणालेत.

गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

नरेंद्र मोदींचे ‘खरे’ चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत राहुल गांधींचे खोटे गावभर फिरून येते. तसेच देवभाऊचे खरे बाहेर पडेपर्यंत शरद पवार यांचे खोटे गावभर फिरून येते. मारकडवाडीत पवार आले तेव्हापासून शरद पवारांची अक्कल आता संपली आहे. शरद पवारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका कश्या होतात. त्याबाबत आमदारांचे प्रशिक्षण घ्यावे आणि मैदानात यावे. ईव्हीएममध्ये घोळ कसा झाला ते सांगावे, असं पडळकरांनी म्हटलंय.

ईव्हीएमवर भाष्य

समोर आंदोलन करणाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही चुकीचा पायंडा पाडतायेत. हे सरंजामशाही स्वतःला राजे मानतात. मी बारामतीत उभा होतो तेव्हा माझे डिपॉजिट जप्त झाले. मग जरा EVM घोळ असता तर मी पराभूत झालो असतो का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 हजार मतांनी पराभव झाला. मात्र त्यावेळी 72 हजार मतं बाद झाली होती. जो राहुलबाबा इथे येणार आहे. त्याच्या मामाच्या गावात पण EVM वर मतदान होतंय. जाऊन मामाच्या गावाला जाऊन बघ एकदा…. असं म्हणत पडळकरांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

जयंतराव पाटील हे सांगतात की, भाजपने 50 हजार मते आधीच सेट केले. त्यामुळे माझा विजय हा 61 हजार मतांनी झालाय पण प्रत्यक्षात ते 11 मतांनी जिंकले आहेत. शरद पवारांना मारकडवाडीचे आकर्षण का वाटतेय? कारण या देशातील जनता 2029 ला मोदींना पंतप्रधान करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना 5 वर्षे मुख्यमंत्री केले हे यांचे दुखणे आहे, असं पडळकर मारकडवाडीत बोलताना म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button