अकलूज येथे महालक्ष्मी समोर तुळजाभवानी मंदिर महाद्वार , पूर्वीच्या काळातील व आधुनिक युगातील वेळेची बचत देखावा

अकलूज येथे महालक्ष्मी समोर तुळजाभवानी मंदिर महाद्वार , पूर्वीच्या काळातील व आधुनिक युगातील वेळेची बचत देखावा
संचार वृत्त अपडेट
काल घरोघरी महालक्ष्मीचे आगमन झाले.आज दुस-या दिवशी महालक्ष्मी समोर आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर-अकलूज येथील
सौ.विद्या उदय शेटे यांच्या घरी महालक्ष्मी समोर तुळजाभवानी मंदिर महाद्वार देखावा व महालक्ष्मीची देवी भक्ताच्या रूपात आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे.(छाया:-केदार लोहकरे, अकलूज)

आधुनिक युगातील स्त्री व जुनी काळातील परंपरा जपाणारी स्त्री
अकलूज येथे महालक्ष्मी समोर पुर्वीच्या काळातील स्त्री व आधुनिक काळातील स्त्री आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. अकलूज येथील रामायण चौकातील सौ.योगिता रणजितसिंह देशमुख यांच्या घरातील महालक्ष्मी समोर पुर्वीच्या काळातील पाटा-वरवंटा वापर करणारी स्त्री आहे तर आधुनिक युगातील स्त्री मिक्सरचा वापर करून वेळेची बचत करत आहेत.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)



