ऊस तोड जोमात,मात्र दर कोमात
ऊस तोड जोमात,मात्र दर कोमात
ज्यादा दरापोटी ऊस तालुक्याच्या बाहेर देण्यास शेतकऱ्यांचा वाढता कल
संचार वृत्त अपडेट
विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या नेत्यांनी साखर कारखाने जोमात सुरू केले आहेत तालुक्यात ऊसतोड जोरात सुरू आहे मात्र ऊस दर कमी असल्याने ऊस दर कोमातच असल्याचे चित्र आहे माळशिरस तालुक्यातील ऊस उत्पादकांना ज्यादा ऊस दराची प्रतीक्षा लागून राहिली आहे दराचेही संकट शेतकऱ्यासमोर उभे असल्याने जीवन कसे जगायचे? या चिंतेत शेतकरी सापडला आहे तरी सरकार,साखर कारखानदार,शेतकरी संघटना,या सर्वांनी ज्यादा ऊस दराबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. तालुक्यातील व बाहेरील कारखानदारांची दरात बरीच तफावत असल्याने ऊस उत्पादकांचा कल बाहेरील कारखान्यास पाठविण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे ऊस लागवडीनंतर रोग किडीचा प्रादुर्भाव,तोडणीसाठीची मनुष्यबळाची कमतरता,सोसायटीचे कर्ज,बँकेचे हप्ते, खराब रस्त्यामुळे वाहतुकीतील अडथळे, ऊस जाण्यासाठी होणारा विलंब,ऊस बिलाची करावी लागणारी प्रतीक्षा,अशा अनेक चिंतेच्या बाबीमुळे ज्यादा दर देणाऱ्या तालुक्यातील बाहेरच्या कारखान्यास ऊस देण्याचा निर्णय शेतकरी घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
शेतकऱ्यांच्या मागण्या
१)सर्व कारखान्यावर शासकीय वजन काटे सुरू करावेत
२)कारखान्याकडून बिलांना विलंब झाल्यास शेतकऱ्यांना त्या रकमेचे व्याज मिळावे
३)ऊस बिले पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावीत
४)गळित हंगाम चालू होण्याच्या अगोदर इतर कारखान्याच्या तुलनेत चांगला ऊस दर जाहीर करावा व तोडणी व वाहतुकीचे दर निश्चित करावेत.