दसूर येथे आर पी आय आठवले शाखेचे उद्घाटन संपन्न
दसूर येथे आर पी आय आठवले शाखेचे उद्घाटन संपन्न
संचार वृत्त अपडेट
अकलूज(प्रतिनिधी)
दसूर (ता.माळशिरस)येथे गाव भेट दौरा गाव तेथे शाखा घर तेथे रिपब्लिकन कार्यकर्ता अभियाना अंतर्गत रिपब्लिकन पक्षाच्या नामफलकाचे उदघाटन
रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री खा.रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली दसूर येथे आरपीआय आठवले नामफलकाचे उदघाटन उत्साहात संपन्न झाले.यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले,युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष किरण धाईंजे,जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले, जिल्हा उपाध्यक्ष एस.एम. गायकवाड,तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे,ज्येष्ठ नेते आबा बनसोडे,तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर,युवक तालुका अध्यक्ष दशरथ नवगिरे,युवक तालुका सरचिटणीस प्रवीण साळवे,तालुका उपाध्यक्ष संजय भोसले,राम कांबळे,संघटक प्रकाश गायकवाड,संपर्कप्रमुख अण्णासाहेब भोसले,युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष चंदनशिवे,तालुका उपाध्यक्ष महेंद्र लोंढे,युवक तालुका उपाध्यक्ष बाबुराव भोसले,ग्रा.प. सदस्य आनंद जाधव,स्वप्निल सरवदे,पंकज भोसले,गणेश सावंत,आतिश आठवले,नितीन जाधव,प्रेम सरतापे,महादेव केंगार,दादा देशमुख,एकनाथ ननवरे,उसमान मुलाणी,बिरदेव केंगार,ऋतीक लोंढे इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शक प्रदिप लोंढे नूतन अध्यक्ष रोहन लोंढे,सरचिटणीस दत्तात्रय कडवळे,कार्याध्यक्ष नागनाथ लोंढे,उपाध्यक्ष सत्यवान लोंढे,उपाध्यक्ष विठ्ठल उबाळे, संघटन सचिव नानासो नाईकनवरे,खजिनदार शरद लोंढे,सहसचिव सचिन ओव्हाळ,यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते.