शिवसेना,युवा सेना च्या वतीने पांडुरंग कारखान्यावरती अर्धनग्न आंदोलन
शेतकऱ्यांच्या उसाला पहिली उचल 3300 रुपये मिळावी यासाठी शिवसेना युवासेनेच्या वतीने अर्ध नग्न आंदोलन
संचार वृत्त अपडेट
सध्या विधानसभा निवडणुकीचा धुरळा शांत झाला असून या निवडणुकीनंतर सर्वच कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडून गाळपास सुरुवात करून एक महिना उलटला तरीसुद्धा अद्याप कुणीही पहिली उचल व ऊस दर जाहीर केला नाही त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाला असून युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे शिवसेना तालुका प्रमुख संतोष राऊत युवा सेना शहर प्रमुख शेखर खिलारे युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या उसाला पहिली उचल ते 3300 रुपये द्या व अंतिम दर 3700 च्या पुढे मिळावा या मागणीसाठी शिवसेनेचे युवा सेनेचे अर्ध नग्न आंदोलन केले असून सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावरून शेतकऱ्यांच्या ऊस दराच्या आंदोलनाची पहिली ठिणगी पडली असून लवकरच हा वनवा सर्वात जास्त ऊस पिकवणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात जिल्हाभर भडकल्या शिवाय राहणार नाही असे चित्र निर्माण झाले आहे
सध्या खताच्या वाढलेल्या प्रचंड किमती उसासाठी लागणारा शेतमजूर आणि आंतरमशागतीसाठीचा खर्च या सर्व गोष्टीचा विचार करता शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळाला पाहिजे पहिली उचल किमान 3300 मिळाली पाहिजे या मागणीचे निवेदन गणेश इंगळे यांनी दिले होते परंतु सर्वच कारखान्यांनी त्यांच्या निवेदनाचा कुठलाही विचार केलेला नाही आज सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना या कारखान्यावर शिवसेना युवा सेनेच्या वतीने अर्ध नग्न आंदोलन केले या आंदोलनाची दखल न घेतल्यास हे आंदोलन जिल्हाभर भडकेल आणि पुढील आंदोलनात होणाऱ्या परिणामाला साखर कारखानदार व महाराष्ट्र शासन जबाबदार असेल असा इशारा गणेश इंगळे यांनी दिलेला आहे या आंदोलनात मध्ये पहिल्यांदा आम्ही शांततेच्या मार्गाने जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शेतकऱ्यावर होणारे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अतिशय शांततेच्या मार्गाने शिस्तबद्धपणे हे आंदोलन करत असलो तरी महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी व शासनाने शेतकऱ्यांच्या या रास्त मागणीचा विचार न केल्यास हे आंदोलन उग्ररूप धारण करेल त्यास महाराष्ट्र शासन आणि साखर कारखानदार साखर सम्राट जबाबदार असतील त्यांनी यावेळी सांगितले .यावेळी पिंटू तात्या चव्हाण शिवसेना तालुका समन्वयक,अनिल बनपट्टे अकलूज शिवसेना शहर प्रमुख,युवराज पवार अकलूज युवा सेना शहर प्रमुख ,सीताराम पाटील दत्ता सुद्रिक गणेश भिताडे रज्जाक मुलानी अप्पा महाडिक गणेश काळे आबा गोसावी इ. शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते .