solapur

शरद पवार व राहुल गांधी यांना संविधानाचे काही देणे घेणे नाही प्रा.मच्छिंद्र सकटे

शरद पवार व राहुल गांधी यांना संविधानाचे काही देणे घेणे नाही प्रा.मच्छिंद्र सकटे

राहुल गांधींना मारकडवाडीमध्ये काळे झेंडे दाखवणार

संचार वृत्त अपडेट 

संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
उत्तम जानकरांनी धनगर असताना खाटीक जातीचा दाखला काढला आहे.त्यांनी खोटा दाखला काठून एस.सी. च्या हक्काची चोरी केली आहे.हे शरद पवारांना,जानकरांना उमेदवारी देताना माहिती नव्हते का? मुळात शरद पवारांनीच पुरोगामित्वाला सोडचिठ्ठी दिली आहे.दलितांचे,आदिवासींचे राजकिय हे त्यांनाच मिळाले पाहिजे असे संविधान सांगते. परंतु शरद पवार आणि राहुल गांधी यांना संविधानाचे काही देणे घेणे नाही.राहुल गांधीना आम्ही मारकडवाडीमध्ये काळे झेंडे दाखवणार असल्याचे दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मछिंद्र सकटे यांनी अकलूज येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
या पत्रकार परिषदेला राजाभाऊ खिलारे,शेखर खिलारे, ॲड.अविनाश काले,बाळासाहेबधाईजे,पी.एस.गायकवाड,केरबा लांडगे,सुनिल अवघडे,पांडुरंग खिलारे,छगनराव गायकवाड व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकटे पुढे म्हणाले, माळशिरस तालुक्यात जात बदलुन सुमारे १५८ जातीचे दाखले काढण्यात आले आहेत. त्यात धनगर समाज अग्रस्थानी आहे.माळशिरस तालुक्या बरोबरच महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जात चोरांची संख्या वाढली आहे.त्यामुळे एस.सी. वर्गात असणाऱ्यांच्या हक्कांवर गदा येत आहे.त्यांच्या राजकिय हक्कांवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे आम्ही माळशिरस तालुका अनुसुचित जाती हक्क संरक्षण कृती समिती तयार केली असून आम्ही जात चोरांच्या विरोधात जनआंदोलन उभे करणार आहोत.त्यांच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढणार आहोत.

शरद पवारांनी २०१९ मध्येच माळशिरस व मोहोळ विधानसभा मतदार संघात अशा जात चोरांना उमेदवारी दिली होती.त्यामुळे त्यांच्या राजकिय भुमिकेबद्दल आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यातील बहुतांश सर्वच राजकिय पक्षांनी अशा जात चोरांना उमेदवारी देवून त्यांना आमदार,खासदार होण्यासाठी मदतच केली आहे.अशा जात चोरांच्या विरोधातील न्यायालयीन लढाई ही फार वेळ खाऊ असते. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत यांचीआमदारकी,खासदारकीची पाच वर्षे संपलेली असतात.

त्यासाठी अशा जात चोरांच्या विरोधातील न्यायालयीन लढाई फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली जावी अशी आम्ही मागणी करत आहोत.अनुसुचित जातींच्या जागांवर राज्यातील प्रामुख्याने धनगर आणि लिंगायत समाजाने अतिक्रमण केलेले आहे.यामुळे आमच्या भावी पिढ्यांच्या राजकिय,शैक्षणिक व आर्थिक अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.या जात चोरांना रोखण्यासाठी तमाम दलितांनी एकत्र येणे गरजेचे आहे. उत्तमराव जानकर हा लबाड धनगर आहे.संविधानाच्या रक्षणासाठी थोडी तरी लाज बाळगून उत्तम जानकरांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे.

गत विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांनी उत्तम जानकरांना धनगर नेता म्हणून राज्यात प्रचारासाठी नेले.तेथे जानकरांना मी किती गरीब धनगर समाजातून आलो आहे. मी कसा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा दिला आहे. असे सांगून मते मिळवण्याचा प्रयत्न केला.मग हेच जानकर स्वतःला राज्यभर धनगर म्हणवून घेतात आणि माळशिरस तालुक्यात आले की खाटीक होतात.हा चमत्कार होतोच कसा.आणि तो शरद पवारांना चालतोच कसा.शरद पवार हे सोयीचे राजकारण करत आहेत. जानकरांना उमेदवारी देणे म्हणजे दलितांच्या विरोधातील कृतीच आहे.हे संविधान विरोधी आहे.
प्रा.मच्छिन्द्र सकटे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button