सहशिक्षिका नाझिया मुल्ला यांना राज्यस्तरीय गुणवंत आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

सहशिक्षिका नाझिया मुल्ला यांना राज्यस्तरीय गुणवंत आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
संचार वृत्त अपडेट
शिक्षण प्रसारक मंडळाच्या महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथील सहशिक्षिका नाझिया मुल्ला यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी शासन मान्यता प्राप्त गुणीजन गौरव पुरस्कार मानकरी महामंच संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत आदर्श शिक्षिका विद्यारत्न नारीगौरव पुरस्कार सुप्रसिद्ध इंटरनॅशनल आयकॉन डॉ.सानिपिना यांच्या शुभहस्ते पुणे येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
सन्मानचिन्ह, गौरव पदक व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून पुणे प्रॅक्टिशनसऺ डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. शुभदा जोशी ,प्राचार्य शिक्षणतज्ञ श्रीमती प्रगती साळवेकर, सेवानिवृत्त एसीपी भानुप्रताप बर्गे उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रातील राबवलेल्या विविध नवोपक्रम याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.नाझिया मुल्ला यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात कल्पकता, नाविन्यता ,वेगवेगळे उपक्रम ,विविध स्पर्धा परीक्षा, उत्तम सूत्रसंचालक, अष्टपैलू व्यक्तिमत्व ,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ,यशस्वी सांस्कृतिक कार्यक्रम अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या कार्याची वाटचाल चालू ठेवली आहे.
या पुरस्काराबद्दल सहकार महर्षि कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील ,संस्थेचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे ,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील ,प्रशालेचे सभापती अॅड.नितीनराव खराडे, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर, पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे यांचे सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.