सं.मा.वि.शाळेत ‘वीर बालदिवस’ साजरा

सं.मा.वि.शाळेत ‘वीर बालदिवस’ साजरा
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात २६ डिसें. वार गुरुवार रोजी ‘वीर बालदिवस’ साजरा करण्यात आला.
त्यानिमित्त स्काऊट गाईडचे जनक ‘लॉर्ड बेडन पॉवेल’ यांच्या प्रतिमेचे पूजन उपमुख्याध्यापक श्री. दत्तात्रय घंटे सर, उपप्राचार्य जाकीर सय्यद, भारत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी
पर्यवेक्षक धनंजय मगर, उमेश बोरावके, स्काउटर जीवन कस्तुरे, गायडर मनीषा सोनवणे,लक्ष्मी अस्वरे व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी स्काऊट व गाईड मधील शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
गाईड शिक्षिका लक्ष्मी अस्वरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना
लॉर्ड पॉवेल यांच्या जीवनकार्याचा परिचय, स्काऊट व गाईडचे जीवनातील महत्व, शिस्तीचे तत्व याविषयीची माहिती आपल्या भाषणातून करून दिली. तसेच त्यांनी अनुभवलेल्या विविध शिबिरातील अनुभव यावेळी सांगितले.
याप्रसंगी शिंदे मॅडम यांनी आपल्या सुरेल आवाजात लॉर्ड पॉवेल यांच्या जीवनावरील जीवनगीत गीताचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट पवार यांनी केले.यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक , सर्व पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.