ऊस दर वाढीचा वनवा;स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर सहकार महर्षी,सासवड माळी कारखान्याची ३००५/- रु पहिली उचल जाहीर

ऊस दर वाढीचा वनवा;स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर सहकार महर्षी,सासवड माळी कारखान्याची ३००५/- रु पहिली उचल जाहीर
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ऊस दराच्या आंदोलनाला आज यश आले आहे. संघटनेने शनिवार 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता ‘सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना’,शंकरनगर-अकलूज च्या गेटसमोर प्रति टन 3400 रू.दरासाठी भव्य आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या दबावानंतर कारखान्याने तातडीने ऊस दराचा पहिला हप्ता जाहीर केला आहे.कारखान्याने काढलेल्या अधिकृत पत्रकानुसार,गाळप हंगाम 2025/26 करिता ऊस उत्पादकांना 30 नोव्हेंबर पर्यंत गाळप झालेल्या उसासाठी प्रति टन 2850/- पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला असून कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या व यापुढे गाळपासाठी येणाऱ्या उसाकरिता प्रति टन ₹3005/- इतका दर निश्चित करण्यात आला आहे.कारखान्याने 3000/- पर्यंतचा दर जाहीर केला असला तरी, हा दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीपेक्षा कमी आहे.आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी प्रतिनिधींनी कारखान्याच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.“कारखान्याने जाहीर केलेला दर समाधानकारक नाही. उसाचा उत्पादन खर्च आणि बाजारातील दर बघता 3400/- मिळणे आवश्यक आहे.पुढील दरवाढीसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील,” अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी घेतली होती.कारखान्याने शेतकरी संघटनांना वेळेत सहकार्य करावे,अशी विनंती पत्राद्वारे केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दरात आणखी वाढ करण्याची मागणी केल्याने पुढील काळात कारखानदार व संघटना यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.तालुकाध्यक्ष अजित बोरकर, ज्येष्ठ नेते मगन काळे, भानुदास सालगुडे,अमरसिंह माने- देशमुख सचिन शेंडगे, राहुल ढेरे,जब्बार,आतार गोपाळ घार्गे, राहुल बिडवे, नेते मगर, दत्ता भोसले, दीपक सावंत, कमलाकर मान देशमुख मदन जाधव


दि सासवड माळी शुगर कारखान्यासही शेतकरी संघटना व माळीनगर येथील ऊस उत्पादक सभासद यांनी वाढीव ऊस दराची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती. पहिली उचल २८००/- रु.प्रमाणे काढला होता. तो संघटनेस मान्य नव्हता कारखाना प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन पहिली उचल ३००५/-रु. जाहीर केली.
“ऊस उत्पादनाचा वाढलेला खर्च, रासायनिक खतांचे गगनाला भिडलेले दर आणि बाजारातील साखरेचा सध्याचा भाव पाहता 3400 रू. हा योग्य दर आहे. कारखान्याने 3000 रू. दर जाहीर केला असला तरी ही दरवाढ अपुरी आहे. शेतकऱ्यांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.”
अजित बोरकर,तालुकाध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना




