सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विशेष साहित्यिक पुरस्कार विश्वास पाटील यांना जाहीर

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील विशेष साहित्यिक पुरस्कार कादंबरीकार विश्वास पाटील यांना जाहीर.
इतर साहित्यिक पुरस्कार कवी आप्पासाहेब खोत,इतिहास लेखक गोपाळराव देशमुख तर माळशिरस तालुक्यातील साहित्यिक परिस्पर्शचे लेखक प्रमोद जोशी यांना जाहीर.
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
आपल्या सिध्दहस्त लेखणीने सामाजीक,वैचारीक,सांस्कृतीक कथा कविता ललित,ऐतिहासीक चरित्र,आत्मचरित्र इ.साहित्य प्रकारामध्ये अमुलाग्र योगदान देऊन समाज प्रबोधन करणा-या साहित्यीकांचा सन्मान करणे करिता श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज यांचे वतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार वितरण सोहळा सन २०२३ पासून सुरू केला असून यावर्षी पुरस्कार जाहीर करणेकरीता महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद संपन्न झाली.
यावर्षी सहकार महर्षि शकरराव मोहिते-पाटील विशेष साहित्यिक पुरस्कार लेखक, कांदबरीकार विश्वास पाटील यांना जाहीर करण्यात आला असून,त्यांनी पानिपत, झाडाझडती पांगिरा,नागकेशर, चंद्रमुखी,संभाजी,महानायक आशा कथा कादंबरी त्यांनी लिहलेल्या आहेत.तसेच साहित्यीक पुरस्कार कथाकथनकार,कादंबरी लेखक, गद्यलेखक,कवी आप्पासाहेब खोत यांना जाहीर करणेत आला असून त्यांनी गवनेर,महापूर, रानगंगा,कळवंड,माती आणि कागुद,मारणादारी,वापसा अनवाणी पाय,कुणब्याची पोर, इ. कथा,कादंबरीचे लेखन केले आहे.तसेच साहित्यीक पुरस्कार दुसरा हा सोलापूर जिल्ह्यातील इतिहासाचे अमुलाग्र लेखन करून अभ्यासकांना मोलाचे मार्गदर्शन करून ग्रंथसंपदा निर्माण करून इतिहास लेखनात महत्वाची भर टाकणारे गोपाळराव देशमुख यांना पुरस्कार जाहीर करण्यात येत असून गहिवर,सोलापूर जिल्ह्याची बखर,असे झुंजले वीर मराठे,मराठी दौलतीचे नारीशिल्प, दोन राजधान्या, सुभेदार माल्हारराव होळकर इत्यादी ऐतिहासीक लेखन केले आहे.तर यावर्षी नव्याने माळशिरस तालुक्यातील साहित्यीक पुरस्कार परिसस्पर्श या चरित्र ग्रंथाचे लेखक,कथा पटकथा एकांकिका,लघुनाटीका, दिग्दर्शक,मालिका,चित्रपट गीत असे अष्टपैलू लेखक प्रमोद जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे.त्यांनी परिसस्पर्श, सालदारचे पोर,अनेक एकांकिका,चित्रपट,नाटक, पटकथा,मालिका लेखन टेलिफिल्म दिग्दर्शन इ. लेखन केले आहे.
माळशिरस तालुका व जिल्ह्यातील साहित्यीक चळवळीला चालना देवून नवनवीन साहित्य प्रकाशात यावे यासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्यिक पुरस्कार गेली तीन वर्षापासून देत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट,शंकरनगर- अकलूज यांचे वतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील साहित्य पुरस्कार २०२५ वितरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते व सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व खा.धैर्यशिल मोहिते-पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार होणार आहे.
सन २०२३ साली विशेष साहित्य पुरस्कार अच्युत गोडबोले (मुंबई) यांना तर ललित साहित्यकृती पुरस्कार डॉ.यशवंत पाटणे (सातारा) व कविता साहित्यकृती पुरस्कार डॉ.राजेंद्र दास (कुर्डूवाडी) यांना देऊन सन्मानित करण्यात आले होते.तर २०२४ साली विशेष साहित्य पुरस्कार इंद्रजित भालेराव व साहित्यिक पुरस्कार डॉ.सुवर्णलता निंबाळकर यांना देण्यात आले होते.
यावर्षी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दि. १५ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना प्रशासकीय कार्यालयातील उदय सभागृह येथे होणार आहे.तरी सर्व साहित्य प्रेमी,वाचक,लेखक,कवी यांनी सदर पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला ट्रस्टी व इतर मान्यवर उपस्थित होते.