महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांची वडूज येथे बदली
महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांची वडूज येथे बदली
संचार वृत्त अपडेट
जेष्ठ पत्रकार ( बी.टी.शिवशरण)
महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांची सातारा जिल्ह्यातील वडुज येथे अचानक बदली झाली आहे त्यांनी आज सकाळी अकरा वाजता वडूज नगरपंचायतीचा पदभार स्वीकारला आहे सतिश चव्हाण यांनी महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे दहा महिने कामकाज पाहिले आहे ते शांत मनमिळाऊ स्वभावाचे आहेत त्यांना त्यांच्या कार्यकाळात काही तांत्रिक बाबी व स्थानिक पातळीवरील गटबाजीचे राजकारण याचा त्रास सहन करावा लागल्याचे समजते त्यांनी स्वतः हुन महाळुंग येथून बदली करुन घेतल्याचे समजते विकासाभिमुख कामापेक्षा त्यांना नगरपंचायतचे संदर्भात अनेक तक्रारी निवेदने माहितीचा अधिकार यातून अनेक विषयांना त्यांना कागदोपत्री त्रास झाल्याने ते महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये नाखूश व अस्वस्थ होते हे त्यांच्या अनेकदा बोलण्यातून जाणवत होते महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये कोणत्याच मुख्याधिकारी यांनी पुर्णवेळ कार्यकाळ पूर्ण केला नाही पहिला पदभार घेतलेले मुख्याधिकारी यांना लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून माळशिरस येथे लाच घेताना अटक केली होती तसेच एक मुख्याधिकारी यांना दोन ठिकाणी पदभार होता आता पर्यंत सतीश चव्हाण हे पाचवे मुख्याधिकारी म्हणून महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये कार्यरत होते त्यांना पुर्णवेळ पदभार सोपविला होता तसेच त्यांची महाळुंग श्रीपूर नगरपंचायतला त्यांच्या नियुक्तीची पहिलीच पोस्टिंग होती एकंदरीत नऊ ते दहा महिन्यांत त्यांना पुरेसा वेळ मिळाला नसल्याने ते नगरपंचायतचे माध्यमातून फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यांची जमेची बाजू एवढीच की ते नगरपंचायत मध्ये भेटायला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना भेटत होते त्यांचे म्हणणे ऐकून घेत होते
नगरपंचायतची पाणी पट्टी घरपट्टी व इतर वसुली बाबत त्यांनी वसुली मोहीम राबवली होती त्यांना फोन केला तर ते उचलून ऐकून घेत तसेच ते मिटिंगमध्ये किंवा कामकाजात असतील तर नंतर ते स्वतः फोन करून विचारणा करत चव्हाण यांच्या बदली नंतर महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये कोण पदभार घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही किंवा तशी कोणाच्या नावांची अद्याप चर्चा नाही मुख्याधिकारी सतिश चव्हाण यांची अचानक बदली झाल्याने महाळुंग श्रीपूर मध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे