solapur

अकलूजमधील ६ आरोपींना केले हद्दपार सोलापूर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आदेश

अकलूजमधील ६ आरोपींना केले हद्दपार सोलापूर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आदेश

२ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यास प्रतिबंधक कारवाई करणार ; नीरज उबाळे

संचार वृत्त अपडेट

संघटित अथवा वैयक्तिक पद्धतीने गुन्हे करून सामाजिक शांतता बिघडवत असलेल्या येथील ६ जणांवर कारवाई करण्याची शिफारस केल्यावरून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यांना ६ मागण्यांसाठी हद्दपारीचा आदेश काढला असून हे लोक या हद्दीत दिसल्यास पोलीस ठाण्यास कळवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी केले आहे. याबाबत माहिती देताना निरीक्षक उबाळे यांनी सांगितले की, अकलूज येथील बळजोरी करून दहशत निर्माण करून, शरिराविषयी गंभीर गुन्हे, विनयभंगाचे गुन्हे, शेतकऱ्यांची जनावरे घेवुन पैसे न देता आर्थिक फसवणुक करणे, इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, मारामारीचे गुन्हे करणारे गुन्हेगार टोळीस हद्दपार करणेबाबत प्रस्ताव दाखल केला होता, त्याची सुनावणी घेऊन पोलीस अधीक्षक यांनी हा आदेश केला आहे. या टोळी प्रमुख व सदस्य यांचेवर अकलुज, सातारा शहर, श्रीरामपूर व अहिल्यानगर येथे गंभीर स्वरूपाचे शरीराविषयी व फसवणुकीचे गुन्हे दाखल होते.तसेच २ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यास प्रतिबंधक कारवाई करणार असल्याचे सांगितले

या आरोपींना हद्दपार केले

करण अभिमान उर्फ अभिमन्यू पवार, बंटी उर्फ अभिषेक अभिमान उर्फ अभिमन्यू पवार, विठ्ठल उर्फ ओंकार सोमनाथ यादव, सागर अतुल पावसे (सर्वरा. अकलूज), विजय शंकर नायडु, आयान ख्वाजा तांबोळी अशी नावे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button