सोलापूर डिसीसी बॅंक तर्फे माळशिरस तालुक्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्काराने सन्मानित

सोलापूर डिसीसी बॅंक तर्फे माळशिरस तालुक्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्काराने सन्मानित
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे)पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बँक जिल्हा कर्मचारी वेल्फेअर ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे स्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना बँक डेव्हलपमेंट प्लॅन दिलेला होता. यामध्ये माळशिरस तालुक्याने २०२१-२२ व २०२२-२३ आणि २०२३/२४ वर्षांमध्ये बँकेने ठेवलेले जिल्हा पातळीवरील एक नंबरचे बक्षीस फिरता चषक तालुक्याने मिळवला होता.त्याचप्रमाणे २०२४/२५ मध्येही तो कायम ठेवत माळशिरस तालुक्याने पटकावला आहे. सोलापूर डी.सी.सी.बँक तालुका माळशिरस उत्कृष्ट कामकाज,जिल्ह्यात एक नंबर वसुली व बँकेने दिलेली टार्गेट पूर्ण करून सोलापूर जिल्ह्यात एक नंबरचे बक्षीस मिळवले आहे.

बँकेचे कुशल प्रशासक कुंदन भोळे,बँकेचे सिईओ श्री.शिंदे, मॅनेजर श्री,देशपांडे यांचे शभहस्ते फिरता चषक व सन्मानपत्र देऊन तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना गौरविण्यात आले.यावेळी आमदार प्रशांत परिचारक,बँकेचे सर्व विभागाचे विभाग प्रमुख,पालक अधिकारी,जिल्ह्यातील सर्व सिनियर बँक इन्स्पेक्टर,सर्व बँक इन्स्पेक्टर, सर्व शाखाधिकारी व जिल्ह्यातील कर्मचारी उपस्थित होते.माळशिरस तालुका सिनियर बँक इन्स्पेक्टर एम. बी.थोरात यांना हि गौरविण्यात आले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील माळशिरस तालुक्याने प्रथम क्रमांकाचे स्थान कायम ठेवत सलग चौथ्या वर्षी ही तालुक्याने कमकाजा बाबतीत माळशिरस तालुक्याने हॅटट्रिक पुर्ण केली आहे.याचे सर्व श्रेय तालुक्यातील सर्व कर्तव्यदक्ष अधिकार व कर्मचारी यांना जाते.



