राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या सोलापूर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी अशोक गायकवाड यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या सोलापूर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी अशोक गायकवाड यांची निवड
संचार वृत्त अपडेट
उप मुख्य मंत्री अजित पवार आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील यांचे विश्वासू सहकारी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक गायकवाड अकलूज यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदाची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली आहे पक्ष स्थापन झाल्यापासून हे आज पर्यंत पक्षावर आणि उप मुख्य मंत्री अजित पवार यांचे विचार तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचविले आहेत त्यामुळे पक्षांनी अशोक गायकवाड यांना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदाची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचेवर सर्व स्तरातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे पक्षाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला जी जबाबदारी दिली आहे त्याला मी त्याचे मी सोने करीन आणि माझेवर टाकलेला विश्वास त्याला मी तडा जाऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.



