गावकामगार तलाठ्याच्या निषेधार्थ कार्यालयास ठोकले टाळे तांदुळवाडी ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा संताप

गावकामगार तलाठ्याच्या निषेधार्थ कार्यालयास ठोकले टाळे
तांदुळवाडी ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा संताप
संचार वृत्त अपडेट
पीक पाणी उतरल्यावर नोंद लावणे, वारंवार शेतकऱ्यांना नोंद धरणे, बोजा कमी करणे यांसारख्या अनेक कामांसाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करत ग्रामस्थ व शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या गावकामगार तलाठ्याच्या निषेधार्थ तांदुळवाडी (ता. माळशिरस) ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी चक्क कार्यालयास टाळे ठोकत आपला संताप व्यक्त केला.
तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथील तलाठी कार्यालयातील गाव कामगार तलाठी मसलखांब यांची मागील दोन वर्षांपूर्वी तांदूळवाडी येथे नियुक्ती झाली आहे. विविध कामांसाठी पैशाची मागणी करत ग्रामस्थ व शेतकरी यांना वेठीस धरत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या.
अॅड. नागेशराव काकडे यांनी संबंधित तलाठींची भेट घेऊन लोकांना त्रास देऊ नका, अशी विनंतीही केली होती. मात्र, गावकामगार तलाठी मसलखांब यांच्या वर्तनात कोणतेही बदल होत नसल्याने सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयास टाळे ठोकले.



