अकलूज टेंभुर्णी रोडची दयनीय अवस्था युवा सेनेने झाडे लावून केला मेघा कंपनीचा निषेध

अकलूज टेंभुर्णी रोडची दयनीय अवस्था युवा सेनेने झाडे लावून केला मेघा कंपनीचा निषेध
संचार वृत्त अपडेट
अकलूज टेम्बुर्णी रोड वरती गेले आठ दिवस झाले भीमा नदीच्या कडेला संगम येथील इंगळेवस्ती येथे खोल खड्डे पडून रोडची दयनीय अवस्था झाली आहे .या रोड वरती वाहनांची सतत रहदारी असते . खोल खड्डे पडल्या मुळे त्या खड्या मध्ये वाहनांची टायरे रुतून बसून रात्र रात्र भर वाहने त्याच ठिकाणी अडकून पडत आहेत. ती वाहने दिवसा ओढून काढावी लागत आहेत .ओढून काढत असताना वाहनांची मोड तोड होत आहे तसेच सतत वाहने फसत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास आहे हे लक्षात घेता युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी वारंवार मेघा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात ही बाब आणून दिल्या नंतर ही मेघा कंपनीने या कडे दुर्लक्ष्य केले असता युवा सेनेच्या वतीने या खड्यात वृक्षा रोपण करून निषेध नोंदवला . यावेळी प्रशांत पराडे, रामभाऊ इंगळे,नवनाथ इंगळे, ओम पराडे, मोनू इंगळे,विकास भोई सोनू इंगळे ई. उपस्थित होते.