सदगुरु श्री श्री साखर कारखान्याचे मोळी पूजन होऊ देणार नाही;अजित बोरकर

सदगुरु श्री श्री साखर कारखान्याचे मोळी पूजन होऊ देणार नाही;अजित बोरकर
गतवर्षीच्या गाळपास आलेल्या ऊसास ३०००/ रुपये दर
संचार वृत्त अपडेट
राजेवाडी येथील सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने २०२३/२४ या गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाला शंभर रुपयाचा हप्ता देण्याचे लेखी आश्वासन दिले होते ते शंभर रुपये तत्काळ न दिल्यास कारखान्याचे मोळी पूजन होऊ देणार नाही असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी लेखी निवेदनाद्वारे कारखाना प्रशासनास दिला आहे
गतवर्षीच्या गळीत हंगामातील दुसरा हप्ता किमान दोनशे रुपये द्यावा कारखान्याच्या बिगर सभासदांना माफत दरात दिवाळीनिमित्त साखर वाटप करावी असे निवेदनात म्हटले आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर,ज्येष्ठ नेते मगन काळे,अमरसिंह माने देशमुख,भिमराव भुसनर पाटील, तेजस भाकरे,नारायण बोराटे,मुकुंद काळे,विकास काळे,सुनील गायकवाड यांच्यासह अनेक ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीमुळे दिवाळीनिमित्त कारखान्याच्या बिगर सभासदांनाही माफक दरात साखर वाटप सुरू करण्यात आले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून दिवाळी गोड होणार असे मत स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी व्यक्त केले.
बिगर सभासदांना साखर वाटप सुरु,१५०/-दिवाळी पूर्वी देणार
बिगर सभासदांना ऊस आलेल्या प्रमाणात 50 टन ऊस आलेला असेल तर दहा किलो 100 टन आलेला असेल तर 20 किलो या पटीत साखर वाटप चालू केले आहे आज बॉयलर पूजनानिमित्त दीडशे रुपये हप्ता जाहीर झाला असून दिवाळी पूर्वी वाटप होणार आहे आपला एकूण दर ३०००/ रुपये झाला.
कारखाना प्रशासन