विकास सार्वजनिक वाचनालयच्या वतीने म.गांधी जयंती स्वच्छाता अभियान राबवून साजरी

विकास सार्वजनिक वाचनालयच्या वतीने म.गांधी जयंती स्वच्छाता अभियान राबवून साजरी
संचार वृत्त अपडेट
नीरा नरसिंहपूर:-येथील विकास सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अहिंसेचे पुजारी,..सत्य,..अहिंसा,.न्याय,..सत्याग्रह,..या तत्वावर भारताला स्वातंत्र मिळवून देणारे युगपुरूष महात्मा गांधी यांची जयंती वाचनालयाच्या परिसरातील स्वच्छता करून साजरी करण्यात आली.!..जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक नारायण खंडाळे सर यांचे हस्ते म.गांधी याच्या प्रतिमेचे पुजन केले.!..या प्रसंगी वाचनालयाचे कार्यवाह धनंजय दुनाखे,..तसेच कार्य.सदस्य डाॅ.अरूण वैद्य,..वाचक श्री.माणिक कोळी,सचिन कोळी,आनंद जोशी,सतीश गवळी,मगनदास क्षीरसागर ,श्रीमती सुतार ई.उपस्थित होते.
सर्व वाचक व पदाधिकारी यांनी ग्राम स्वच्छता अभियान अतर्गंत वाचनालय परिसरातील स्वच्छता केली..यावेळी श्री.खंडाळे सर यांनी म.गांधी यांच्या देशसेवेच्या कार्यांचा आढावा तसेच मिठाचा सत्याग्रह,..चलेजाव चळवळ,..अहिंसेच्या माध्यमातून राजक्रांती..माहीती दिली.!,,डाॅ.वैद्य यांनी दांडी यात्रा,..कुष्ठरोगांची सेवा कलणे,..स्वलंबन,.चलनी नोटांवर म.गांधीचा फोटो ,..आर्थीक ,..सामाजिक कार्य ,.विवेचन केले.!..वाचकांची मनोगते झाली.!.सुत्रसंचालन व आभार धनंजय दुनाखे यांनी मानले.
धोरणा विषयक माहीती दिली.!..