solapur

स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

स्वराज्य पोलिस मित्र,पत्रकार संरक्षण संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

संचार वृत्त अपडेट 

आज सहा जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो.६ जानेवारी १८३२रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले.तो दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे महत्त्व म्हणून महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो.

अकलूज येथील स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या वतीने शामसुंदर भागवत व सुधिर शहाणे यांनी पुष्पगुच्छ व पेन देऊन अकलूज येथील पत्रकारांचा यथोचित सन्मान केला.गेल्या काही वर्षांपासून स्थानिक पत्रकार यांचा सन्मान करण्याची परंपरा जोपासली जाते.


यावेळी जेष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार,भारत मगर,शिवाजी पालवे, नागेश लोंढे, कृष्णा लावंड,लक्ष्मीकांत कुरुडकर ई.पत्रकारांचा सन्मान करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी जनसेवा संघटनेचे अण्णासाहेब शिंदे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button