गुप्त बैठकीत ‘दर स्पर्धा नको’चा ठराव ? बैठकीच्या चर्चेने खळबळ, ‘ओंकार’

गुप्त बैठकीत ‘दर स्पर्धा नको’चा ठराव ?
बैठकीच्या चर्चेने खळबळ, ‘ओंकार’ला बदनाम करण्याचा कट?
2000 कोटी थकबाकीचा व्हिडिओ खोटा? सोशल मीडियावरून बदनामीचा प्रयत्न?
जो जास्त दर देईल त्याला खिंडीत पकडा कारखानदारांच्या गुप्त बैठकीची शेतकऱ्यांत चर्चा, ओंकार शुगरचे 17 युनिट टार्गेटवर ? कारखान्यांना ओंकार शुगरचा धसका ?
संचार वृत्त अपडेट
“सोलापूर जिल्ह्यात ऊस दराची स्पर्धा कोणीच करायची नाही” असा एकमुखी निर्णय घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांची आठ दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची खळबळजनक चर्चा ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे. या बैठकीला साखर आयुक्त कार्यालयातील एक जबाबदार अधिकारीही उपस्थित होता, अशीही चर्चा आहे. या संपूर्ण प्रक्रियेतून इतरांपेक्षा जास्त दर देणाऱ्या ‘ओंकार शुगर’ला टार्गेट केले जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी ऊस दरावरून स्पर्धा न करण्याचा अलिखित करार केला. ज्यामुळे शेतकऱ्यांना जास्त दराचा लाभ मिळू नये, असा डाव असल्याची चर्चा आहे.
ओंकार शुगरचे सध्या 17 युनिट चांगल्या स्थितीत सुरू असून, ते इतर कारखान्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांना चांगला व वेळेवर दर देत आहेत. त्यामुळेच इतर कारखानदारांनी ओंकार शुगरला ‘खिंडीत पकडण्या’साठी ही मोहीम हाती घेतली आहे का, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियावर ‘ओंकार शुगरचे 2000 कोटी थकीत आहेत’ असा व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात ओंकार शुगरने सर्व कारखान्यांची ऊस बिले नियमितपणे अदा केली असून, थकबाकीचा दावा पूर्णपणे खोटा व बदनामीकारक असल्याचे कंपनीशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे.सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराच्या शर्यतीत ‘ओंकार शुगर’ने गेल्या गळीत हंगामात बाजी मारली आहे. जिल्ह्यात उच्चांकी ऊस दर देण्यासोबतच ऊस बिलांची वेळेत परतफेड केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ओंकार शुगरने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्याचे चित्र गेल्या हंगामात ठळकपणे दिसून आले.गेल्या हंगामात जिल्ह्यातील अनेक जुन्या व प्रस्थापित साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जेमतेम जास्त दर दिला.जुने कारखाने दर वाढवत नसल्याने व बिलांसाठी शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने अनेक ऊस उत्पादक नाराज होते. याचा थेट फायदा ओंकार शुगरला झाला. उच्चांकी दर व तत्पर पेमेंटमुळे गेल्या हंगामात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपला ऊस ओंकार शुगरच्या युनिटकडे घेऊन गेले. “पैसे वेळेवर मिळाले की पुढच्या हंगामाचे नियोजन करता येते. ओंकारने आमचा विश्वास जिंकला आहे,” अशी भावना अनेक शेतकऱी व्यक्त करत आहेत.१७ युनिट, तरीही शिस्तबद्ध व्यवस्थापन
ओंकार शुगरचे जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर मिळून १७ युनिट चांगल्या क्षमतेने सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर गाळप होऊनही, ऊस वाहतूक, वजन काटा व बिल पेमेंटमध्ये पारदर्शकता व शिस्त राखल्याने शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील ऊस दराच्या पारंपरिक समीकरणांना छेद बसला असून, ‘ओंकार पॅटर्न’ची चर्चा सुरू झाली आहे.
यंदाच्या हंगामातही ओंकार शुगरकडून चांगल्या दराची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत असून, इतर कारखान्यांपुढे दर वाढवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.जुन्या कारखान्यांना ‘ओंकार’चा धसका
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील जुने कारखाने एफआरपीपेक्षा नाममात्र जास्त दर देऊन वेळकाढू पणा करत होते. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. याच वेळी बाबुराव बोत्रे पाटील यांनी मंत्री-आमदारांचे बंद पडलेले कारखाने ताब्यात घेऊन, विक्रमी 400 रुपयांपर्यंत जास्तीचा दर जाहीर केला. यामुळे गेल्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा ओघ ओंकार शुगरच्या युनिटकडे वळल्याचे चित्र होते या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामात ऊस दरावरून मोठा संघर्ष अटळ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे
जाणीवपूर्वक सोशल मीडियाच्या माध्यमातून ओंकार शुगर परिवाराचे बदनामी व दिशाभूल केली जात असून संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
ओम राजे बोत्रे पाटील
नियमात नाही, पण शेतकरी सुखी’ ओंकार शुगर नियमांना डावलून दर देत आहे. मात्र, “नियम न पाळता का होईना, पण जो आम्हाला चार पैसे जास्त देतो, तोच आमचा खरा कैवारी आहे,” अशी आमची ठाम भूमिका आहे. “ओंकार शुगरला उगाच ट्रोल करू नका, बदनाम करू नका.
दत्तात्रय सरगर (ऊस उत्पादक शेतकरी माळशिरस)
ओंकार शुगरच्या ऊस दर धोरणामुळे आगामी गाळप हंगामात इतर कारखान्यांना दर वाढवावा लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळेच ओंकार शुगर ‘अडसर’ ठरत असल्याची भावना कारखानदार लॉबीत आहे. शेतकरीहिताचा निर्णय घेतल्याने ओंकार शुगरला शेतकऱ्यांचे मोठे समर्थन मिळत असून, “दर स्पर्धेत टिकू न शकणारे कारखानदार आता ओंकारला बदनाम करण्याचा डाव रचत आहेत.
धनाजी वाघमोडे (ऊस उत्पादक शेतकरी झंजेवाडी)
स्पर्धक नको” अशी भूमिका घेऊन सोलापूर जिल्ह्यातील प्रस्थापित साखर कारखानदार एकवटले असताना, शिरूर येथील उद्योजक बाबुराव बोत्रे पाटील यांच्या ‘ओंकार शुगर’ने मात्र शेतकरी हिताचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. मंत्री व आमदारांचे तोट्यातील कारखाने भाडेतत्त्वावर घेऊन चालवणाऱ्या ओंकार शुगरने गेल्या हंगामात इतर कारखान्यांच्या तुलनेत जास्तीचा उच्चांकी दर दिला.
संजय वाघमोडे (ऊस उत्पादक शेतकरी तरंगफळ



